कार चालकाच्या एका छोट्याशा चुकीमुळे महामार्गावर भीषण अपघात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रस्त्यावरून चालताना आपल्याला सावधानीने जावे लागते नाहीतर आपली एक चूक आपल्याला खूप महागात पडू शकते. याच रस्ते अपघातांमुळे (Accident) दरवर्षी अनेक कुटुंबं उद्ध्वस्त होतात. सध्या अशाच एका अपघाताचा (Accident) व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसेल.

काय घडले नेमके?
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कि, एक पांढऱ्या रंगाची कार हायवेवरुन जाताना दिसत आहे, मात्र काही सेकंदांनंतर ड्रायव्हर अचानक रस्त्यावरच गाडी थांबवतो आणि वळवायला सुरुवात करतो. अचानक रस्त्यात गाडी वळल्यामुळे मागून येणाऱ्या ट्रकचा तोल बिघडतो. ट्रकचालक अचानक ब्रेक लावून कारला धडकण्यापासून वाचण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान, अचानक दाबलेल्या ब्रेकमुळे हा ट्रक पलटी (Accident) होतो.

एवढी मोठी चूक होऊनही कारचालक आपल्या कृतीत सुधारणा करत नाही आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या एका वाहनाला धडकता धडकता थोडक्यात वाचतो. एवढं सगळं झाल्यावर तो मोठया सहजतेने काहीच न झाल्यासारखं आपली गाडी पुढे नेतो. जणू काही त्याला काहीच फरक पडला नाही. हा व्हिडिओ @javroar या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

हे पण वाचा :
एकवीरेला चाललेल्या कारने बोरघाटात घेतला पेट, व्हिडिओ आला समोर

‘या’ देशात चक्क युरीनपासून बनवली जाते बिअर !!! तुम्ही ते पिण्याचे धाडस कराल का???

पेट्रोल पंपावर आग लागताच धावू लागले लोक, धाडसी महिलेनं वाचवला सगळ्यांचा जीव

एका महिन्यात ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला तब्ब्ल 158.59% रिटर्न !!!

Online Shopping वेबसाइट्सवरील fake reviews ना आळा घालण्यासाठी सरकारने उचलले ‘हे’ पाऊल