औरंगाबाद | जिल्ह्यासह शहरात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केले जात नसल्याने शहरासोबतच आता ग्रामीण भागातही रूग्ण वाढू लागले आहेत. विशेष म्हणजे कोरोनाचा हा नवा स्ट्रेन अधिक गतीने पसरत आहे. त्यामुळे वर्षभरात आढळलेल्या रूग्णांपेक्षा मार्च महिन्यात 31 दिवसांत आढळलेल्या कोरोना रूग्णांच्या संख्येने आजवरचा सर्वाधिक उच्चांक गाठला आहे.
मार्चमध्ये तब्बल 32,313 रूग्ण आढळले असून वर्षभरातील हा धक्कादायक आकडा ठरला आहे. त्यामुळे हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी चुका सुधारून नियमांचे पालन करणे क्रमप्राप्त झाले आहे. राज्यात मुंबईनंतर आता औरंगाबादेत कोरोनाचा स्ट्रेन अधिक गतीने पसरत असल्याचे दिसून येत आहे. गववर्षी मार्च ते डिसेंबर 2020 पर्यंत जिल्ह्यात सुमारे 40 हजार रूग्ण आढळले होते. त्यानंतर जानेवारी 2021 पासून जिल्ह्यात रोेज आढळणार्या कोरोना रूग्णांची संख्या कमी होऊन 20 ते 25 पर्यंत आली होती. साधारणतः 14 फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यांची स्थिती दिलासादायक होती.
दरम्यानच्या काळात बाजारपेठांत वाढलेली गर्दी, प्रशासनाने दिलेली ढील, कोरोना चाचणीचे कमी झालेले प्रमाण, एवढेच नव्हे तर नागरिकांनी काळजी घेणे सोडून दिले होते. परिणामी, 15 फेब्रुवारीनंतर जिल्ह्यात पुन्हा कोरोना रूग्ण वाढण्यास सुरूवात झाली. मार्च महिन्यात मात्र कोरोना संसर्गाने एकदमच उसळी घेतली. त्यातही 10 मार्चपर्यंत स्थिती सामान्याच्या काहीसी वरती होती. मात्र त्यानंतर रोज हजारापेक्षा अधिक रूग्णांची भर पडत आहे.
23 मार्चला सर्वाधिक 1791 रूग्ण आढळून आले. हा आजपर्यंतचा सर्वाधिक उच्चांक ठरला. मात्र धक्कायदायक बाब म्हणजे मार्च महिन्यात जिल्ह्यात तब्बल 32,313 नवीन रूग्ण आढळले, ही बाब धक्कादायक मानली जात आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा