धक्कादायक !!! मॉलमध्ये खरेदी करणाऱ्या महिलेवर सर्वांसमोर बलात्कार करण्याचा प्रयत्न

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फ्लोरिडा । आजच्या काळात महिलांना कुठेही सुरक्षित वाटत नाही. घर असो वा बाहेर, महिलांना सर्व प्रकारच्या छेडछाडीला सामोरे जावे लागते. स्त्रियांना कमी लेखणाऱ्या पुरुषांना आता उघड्यावर त्यांची छेडछाड करण्याची देखील भीती राहिलेली नाही. म्हणूनच फ्लोरिडामधील मियामी येथील एका शॉपिंग मॉलमध्ये इतर अनेक लोकांच्या उपस्थितीत तेथे खरेदी करणाऱ्या महिलेवर एका व्यक्तीने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

फ्लोरिडामधील मियामी येथील वॉलमार्टमधून ही बाब समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रेंडन हार्वे असे या आरोपीचे नाव आहे. गेल्या शनिवारी मॉलमध्ये खरेदी करणाऱ्या महिलेवर त्याने सर्वांसमोर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. आरोपीने अचानक महिलेला मागून पकडून तिचे कपडे काढण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर महिला आरडाओरडा करू लागली, त्यानंतर आजूबाजूची इतर लोकं तिच्या मदतीसाठी पुढे आले. काही लोकांनी आरोपीला पकडले, त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

सर्वांसमोर कपडे काढले
ही घटना त्यांच्यासाठी धक्कादायक असल्याचे या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. गजबजलेल्या परिसरात या व्यक्तीने विनयभंग करण्याचे धाडस कसे केले, याबाबत सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तेथे खरेदी करणाऱ्या महिलेचे कपडे काढण्यास सुरुवात केली. यानंतर मागून तिच्या अंगाला स्पर्श करू लागला. त्याने त्या महिलेला तिथेच ढकलले आणि तिच्यावर चढू लागला. महिलेचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे खरेदी करणारी लोकं तेथे आले आणि त्यांनी आरोपीला महिलेपासून दूर नेले.

स्तब्ध झाली लोकं
या घटनेनंतर लोकं हादरले आहेत. आरोपीला पोलिसांनी अटक केली असली तरी खरेदीसाठी आलेल्या इतर अनेक महिलांनी ते थक्क करणारे असल्याचे सांगितले. उघड्यावर महिला विनयभंगाची शिकार होईल, असे स्वप्नातही वाटले नसेल, असे अनेकांनी सांगितले. तपासात समोर आले की, आरोपी आधीच एका गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. घटनेच्या वेळी तो जामिनावर बाहेर होता. सध्या महिलेला आरोपीपासून दूर ठेवण्यात आले असून 38 लाख रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.