धक्कादायक! परभणीत 112 पोलिसांना कोरोनाची लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी : कोरोनाला रोखण्यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र प्रयत्न करीत आहे. मात्र आता परभणी मध्ये सेवा देणाऱ्या 112 पोलिसांनाच कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे परभणीतील पोलीस विभागात एकच खळबळ माजली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, 112 पोलीस पॉझिटिव्ह आले आहेत त्यामध्ये 16 पोलिस अधिकारी आहेत. 46 कर्मचारी तर होमगार्ड 10 आहेत. राज्य शासनाने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी सगळीकडे व्हावी यासाठी पोलिस सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. तर राज्य शासनाने संचार बंदीचा निर्णय घेतला यामुळे कालपासून पंधरा दिवस ताण पोलीस दलावर पडणार आहे. काटेकोर नियमांचे पालन व्हावे यासाठी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंध करणे, बिना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणं या गोष्टी बंधनकारक झाल्या आहेत. यामुळे पोलिस यंत्रणेवर अधिक ताण पडतो आहे. अशातच तब्बल 112 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्यामुळे मात्र चिंता व्यक्त केली जात आहे.

परभणी जिल्ह्यात सध्या एकूण पोलिस दलातील बाधितांची संख्या 258 इतकी आहे. त्यामध्ये 41 अधिकारी, 203 कर्मचारी, 11 होमगार्ड, 2 लिपिक आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह 3 पोलिस निरीक्षक, 3सहाय्यक पोलीस निरीक्षक, 9फौजदार आणि 1 शिपायाचा समावेश आहे. तसेच सहा जणांनी आपला प्राण गमावला आहे. तर सध्या 112 पोलिसांवर उपचार सुरू आहेत.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment