धक्कादायक!!! घरी राहिल्याने सुद्धा होतोय कोरोना; संशोधकाचा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । जगभरात सुरू असलेले कोरोना युद्ध कधी संपले जाईल आणि त्यासाठी कोरोनाची लस बाजरामध्ये कधी उपलब्ध होईल याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अनेक ठिकाणी लॉक डाउन सारखे पर्याय निवडले आहेत अनेक देशातील लोकांना घरी बसण्याचा सल्ला तेथिल प्रशासनाने दिला आहे .परंतु घरी राहिल्यानंतर ही कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका कमी होत नाही. अशी माहिती नव्या संशोधनातून समोर आली आहे.

घरात बसूनही तुम्ही कोरोनामुळे संक्रमित होऊ शकता असा दावा दक्षिण कोरियातील शास्त्रज्ञांनी केला आहे. एकूण १०० व्यक्तींपैकी दोन जणांना कोरोनाची लागण ही बाहेरील लोकांपासून किंवा बाहेर गेल्याने झाला आहे. म्हणजेच ते बाहेरच्या कारणाने संक्रमित झाले परंतु १० व्यक्तींपैकी एका व्यक्तीला कोरोना हा घरातल्या लोकांच्या माध्यमातून झाला. असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे कोरोनाचा संसर्ग हा ठराविक वयो मांनुसार मर्यादित राहिला नाही. लहान मुलांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वाना कोरोना होत आहे. घरात राहण्याऱ्या तरुणानं आणि जेष्ठ लोकांना कोरोना होण्याचे प्रमाण जास्त आहे.घरात आणले जात असलेल्या बाहेरील समानामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची जास्त शक्यता आहे असे कोरियन डॉक्टरांनी आपल्या संशोधनातून नमूद केले आहे.

दक्षिण कोरियातील संशोधकांनी सुरू केलेले हे अध्ययन यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिवेंशन हे १६ जुलै रोजी प्रसिद्ध केले आहे. सुरुवातीच्या काळात ५ हजार ७०६ रुग्ण आणि नंतर बाधित झालेले ५९ हजार जणांचा अहवाल तपासला आहे आणि त्यानुसार निष्कर्ष काढण्यात आले आहेत.हॉलीम विद्यापीठ महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ चो यंग यांनी सांगितले की ९ वर्षापेक्षा कमी वयातील मुलांना कोरोनाची संसर्ग होण्याची शक्यता फार कमी आहे. बहुतांश मुलं ही अस्थमॅटिक असतात त्यांच्यातील लक्षणे लवकर दिसून येत नाहीत. त्यामुळे त्यांना ओळखणे अवघड झाले आहे परंतु हा विषाणू कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला सोडत नाही त्यामुळे घरात असलात तरी सुरक्षित असाल अस सांगता येत नाही त्यामुळे घरात ही सोशल डिस्टन्स चे पालन करावे लागेल तसेच खबरदारी च्या उपाययोजनांचे पालन करावे लागेल असे डॉ. चो यंग म्हणाले.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

 

Leave a Comment