धक्कादायक : कराडला दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थींनीचा अचानक मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | शहरातील एसएमएस इंग्रजी स्कूलमधील दहावीतील स्नेहा डुबल हीचे अचानक निधन झाले. स्नेहाने दहावीचे दोन पेपरही दिले होते. त्यानंतर तीच्या पोटात दुखू लागल्याचे निमित्त झाले होते. तीच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असताना तीचा दुर्देवी मृत्यू झाला.

एसएमएस इंग्रजी माध्यमाच्या शाळेत स्नेहा दहावीत होती. बोर्डाची परीक्षा देत असलेल्या स्नेहाच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे. स्नेहाने दहावीचे परीक्षा सुरू झाल्यानंतर दोन पेपर दिले मात्र त्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागले. तीला रुग्णालयात दाखल केले, प्रकृती खालावल्याने तिला कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सूरू असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शहरातील रुक्मिणीनगर येथे राहते. स्नेहाने दहावीचे दोन पेपर दिला मात्र त्यानंतर स्नेहाला पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने तिच्या उपचारार्थ रूग्णालयात दाखल केले. दोन दिवस उपचार सूरू असताना तिचा दुर्देवी मृत्यू झाला. स्नेहा शाळेतील प्रत्येक उपक्रमात सहभागी असत. घटनेमुळे तिच्या वर्गमैत्रिनींच अस्वस्था होती. अनेकांनी तिच्या घराकडे धाव घेतली.