औरंगाबाद – मुलींची छेड काढू नये असे समजावून सांगणाऱ्या मुख्याध्यापक व वसतिगृह अधिक्षकावर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड शहराजवळ घडली. कन्नड शहरा जवळील साखर कारखान्यासमोर आसलेल्या कर्मवीर काकासाहेब महाविद्यालयात ही खळबळजनक घटना आज घडली. या घडनेमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. मुजीब जमील शेख असे आरोपीचे नाव आहे.
यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मुजीब जमील शेख हा मक्रणपूर येथील रहिवासी आहे. मुजीब जमील शेख हा युवक शाळा सुटली की दररोज शाळेबाहेर येवून मुलींची छेड काढत असे. यासंदर्भात मुलींनी हा प्रकार मुख्याध्यापक ए पी चव्हाण यांना सांगितला. दरम्यान, शाळा सुटल्यावर मुजीब जमील शेख हा युवक तेथे दिसल्याने मुख्याध्यापक चव्हाण यांनी त्याला जाब विचारला. दररोज या परिसरात कशाला येतो, असा जाब मुख्याध्यापक यांनी मुजीब जमील शेख याला विचारला. याचा राग आल्याने मुजीब जमील शेख याने तलवारीने मुख्याद्यावक चव्हाण यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला.
मुजीब जमील शेख याने केलेल्या तलवारीचा हल्ला मुख्याद्यापक चव्हाण यांनी चुकवला, मात्र तलवारीचा हा वार मुख्याध्यापक चव्हाण यांच्या खांद्याला व कानावर बसला. त्यामुळे मुख्याध्यापक चव्हाण यांच्या खांद्याला व कानाला गंभीर जखम झाली. दरम्यान ही घटना समजताच वसतिगृह अधिक्षक संतोष जाधव हे मुख्याद्यापक चव्हाण यांच्या मदतीला धावले. याशिवाय अन्य शिक्षक वर्ग मदतीला धावल्याने मुजीब जमील शेख हा घटनास्थळावरून पसार झाला. शिक्षकानी जखमी मुख्याध्यापक व सहकारी यांना रुग्णालायात दाखल केले. या घटनेमुळे मराठवाड्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.