धक्कादायक ! घाटीत चोवीस तासांत बारा कोरोनाबाधितांचा मृत्यू

उपचारातील 431 कोरोनाबाधितांची प्रकृती गंभीर

औरंगाबाद  येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (घाटी) उपचार सुरू असलेल्या बारा कोरोनाबाधितांचा मागील चोवीस तासांत मृत्यू झाला. घाटीत सध्या 431 कोरोनाबाधितांची प्रकृती गंभीर आहे. तर 159 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. घाटीत आतापर्यंत सहा हजार 485 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यापैकी तीन हजार 535 सुट्टी देण्यात आली आहे. तर एक हजार 377 जणांचा आतापर्यंत घाटीत मृत्यू झाला आहे. दरम्यान, शनिवारी घाटीतून सहा जणांना सुट्टी देण्यात आली.

गेल्या चोवीस तासात फुलंब्रीतील 55 वर्षीय वृध्दाचा 1 एप्रिल रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मृत्यू झाला आहे. चिकलठाणा येथील 50 वर्षीय वृध्दाचा दुपारी सव्वादोनच्या सुमारास मृत्यू झाला. प्र्रथमेशनगर, देवळाई येथील 65 वर्षीय वृध्दाचा 2 एप्रिल रोजी सायंकाळी सातच्या सुमारास, फुलंब्रीतील 85 वर्षीय वृध्देचा सायंकाळी साडेसहाच्या सुमारास, मंगरुळ येथील 78 वर्षीय वृध्देचा सायंकाळी पावणेसातच्या सुमारास, गुलमंडी परिसरातील 90 वृध्देचा 3 एप्रिल रोजी पहाटे तीनच्या सुमारास मृत्यू झाला.

रशीदपुरा भागातील 60 वर्षीय वृध्दाचा पहाटे सव्वाचारच्या सुमारास, कन्नड येथील 73 वर्षीय वृध्दाचा मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास व 55 वर्षीय वृध्दाचा 2 एप्रिल रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास मृत्यू झाला आहे. रायवाडी, धावडी येथील 65 वर्षीय वृध्देचा 3 एप्रिल रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास, सिल्लोड येथील 60 वर्षीय वृध्दाचा रात्री पावणेएकच्या सुमारास तर गंगापूरातील 47 वर्षीय वृध्देचा दुपारी दीडच्या सुमारास मृत्यू झाला आहे.

You might also like