धबधब्याजवळ भलामोठा खडक नौकेवर कोसळला; 7 जणांचा मृत्यू (Video)

brazil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

ब्राझील : वृत्तसंस्था – ब्राझीलमधील एका धबधब्याजवळ एक भीषण दुर्घटना घडली आहे. यामध्ये धबधब्याजवळ गेलेल्या पर्यटकांवर दगड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. धबधब्याजवळील कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला तर 32 जण जखमी झाले आहेत. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

काय आहे नेमका प्रकार
ब्राझीलमधील झील तलावात कोसळणाऱ्या धबधब्याजवळ पर्यटक गेले होते. नौकेत बसून पर्यटक तेथील निसर्गरम्य परिस्थीतीचा आनंद घेत होते. त्याच दरम्यान धबधब्याजवळील एक भलामोठा दगड खाली कोसळला. जेव्हा हि दुर्घटना घडली तेव्हा त्या ठिकाणी अनेक नौका हौत्या यापैकी एक नौकेवर हा दगड कोसळला. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे तर 32 जण जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.

https://twitter.com/otempo/status/1479848764940640258

धबधब्याजवळ मोटर बोट फिरत असताना अचानक खडक कोसळला आणि हि दुर्घटना घडली. घटनास्थळावरुन 32 जणांना वाचवण्यात आले आहे. यापैकी 9 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य मोठ्या प्रमाणात सुरु आहे अशी माहिती लेफ्टनंट पेद्रो एहारा यांनी दिली आहे. या दुर्घटनेत अजूनही 20 जण बेपत्ता असल्याचे समजत आहे.