Short Budget Trips In India : उन्हाळी सुट्टी एन्जॉय करा फक्त 5 हजारात; ‘हे’ आहेत शॉर्ट बजेट ट्रिपसाठी बेस्ट पर्याय

Short Budget Trips In India
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Short Budget Trips In India) सध्या सगळीकडे सूर्य जणू आग ओकतोय. वातावरणात वाढलेला उष्मा अक्षरशः जीव काढतोय. घामाच्या नुसत्या धारा लागल्या आहेत. सर्वसाधारणपणे एप्रिल महिन्यापासून तापमान असेच वाढू लागते. सध्या अनेक भागातील तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे. या कडक उन्हाच्या दिवसांमध्ये मुलांच्या शाळांना सुट्टी असते. त्यामुळे या दिवसांत अनेक पालक आपल्या मुलांना घेऊन कुठेतरी शॉर्ट ट्रिप करण्याच्या विचारात असतात.

पण कधी कधी फार बजेट नसल्यामुळे पिकनिक टाळाव्या लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला फक्त ५ हजाराच्या बजेटमध्ये एन्जॉय करता येतील असे काही बेस्ट पर्याय सुचवणार आहोत. ज्यामुळे तुमचा खर्चसुद्धा फार होणार नाही आणि व्हॅकेशन कॅन्सल झालं म्हणून मुलांचा हिरमोडसुद्धा होणार नाही. चला जाणून घेऊया.

बजेट किती? फक्त 5 हजार (Short Budget Trips In India)

फिरायला जायचंय? पण बजेट खूप कमी आहे तर आता चिंता करण्याची गरज नाही. कारण आपण खिशाला परवडतील आणि मनाला आवडतील अशा काही मस्त पर्यटन स्थळांबद्दल माहिती घेत आहोत. जिथे फक्त ५ हजारांचे बजेट पुरेसे आहे.

मसुरी

उत्तराखंडच्या मसुरीत ऐन उन्हाळ्यातसुद्धा थंड वारे वाहतात. जे मनाला सुखावणारे असतात. या भागाला ‘पहाडांची राणी’ असे म्हणतात. दिवसा दुचाकीवरून मसुरीच्या रस्त्यांवर फेरतका मारणे, सोनेरी सूर्यप्रकाशात थंड वाऱ्याची झुळूक अंगावर घेणे यामध्ये काही वेगळाच फील आहे. (Short Budget Trips In India) याठिकाणी कंपनी गार्डन, दलाई हिल्स, लाल टिब्बा, केम्पटी फॉल अशी काही प्रेक्षणीय स्थळे आहेत. येथे ऍडव्हेंचर गेम्सचा आनंद अगदी बजेटमध्ये घेता येतो. तर राहण्याचा, खाण्यापिण्याचा आणि प्रवासाचा खर्च अगदी ५ हजार रुपयांपेक्षा कमी येतो.

पचमढी

मध्य प्रदेशात पचमढी हे एकमेव हिल स्टेशन आहे. जिथून दूरवर पसरलेल्या सातपुडा टेकड्या आणि हिरवा निसर्ग पाहता येतो. पचमढीच्या लेण्या तुम्हाला पुरातन आणि प्राचीनद नक्षीकाम दाखवतात. तर इथे छोटे मोठे धबधबे अगदी सहज लक्ष वेधून घेतात. ऐन उन्हाळ्याच्या दिवसात इथे तुम्हाला हायकिंग आणि ट्रेकिंगचा आनंद घेता येईल.

(Short Budget Trips In India) मुख्य म्हणजे तुम्ही पचमढीला पिपरिया रेल्वे स्टेशनवरून प्रवास करून जाऊ शकता. भोपाळ किंवा जबलपूर विमानतळावरून देखील प्रवास करू शकता. याशिवाय पचमढीपर्यंत जाण्यासाठी सुंदर रस्ते सुद्धा आहेत. महत्वाचे म्हणजे, इथे जाण्यासाठी प्रवास खर्च, राहण्याचा आणि खाण्यापिण्याचा खर्च फार महाग नसल्यामुळे तुम्ही कमी बजेटमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेऊ शकता.

धरमशाला

धरमशाला हे हिमाचलच्या दऱ्याखोऱ्यांतील अत्यंत सुंदर असे प्रेक्षणीय स्थळ आहे. जर तुम्ही उन्हाळी सुट्ट्यांमध्ये फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर धरमशाला उत्तम ठिकाण आहे. इथे तिबेटचे ध्वज फडकताना दिसतात आणि म्हणून या भागाला ‘मिनी तिबेट’ म्हणून ओळखले जाते. (Short Budget Trips In India) या ठिकाणी फिरायला भव्य बाजारपेठ, संग्रहालये आणि मठ आहेत. येथे जाण्यासाठी दिल्ली, शिमला आणि डेहराडून येथून बससेवा उपलब्ध आहेत. ज्या अत्यंत कमी बजेटमध्ये आहेत. तसेच इथे राहण्याचा खर्चदेखील कमी आहे.

माउंट अबू

राजस्थानमध्ये माउंट अबू हे एकमेव हिलस्टेशन आहे. जिथे एप्रिल दरम्यान पर्यटकांची मोठी गर्दी दिसते. इथे घनदाट जंगले, ग्रॅनाइटच्या शिखराने वेढलेली जैन आणि हिंदूंची अनेक पवित्र तसेच प्राचीन मंदिरे आहेत. गरमीच्या दिवसातही माउंट अबू हे थंड तापमान असणारे ठिकाण आहे. इथे जाण्यासाठी अबू रोड हे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे. तसेच बाय रोड देखील तुम्ही निसर्ग पाहत जाऊ शकता. (Short Budget Trips In India)