विरोधी पक्ष नेते दाखवा आणि बक्षीस मिळवा ; रघुनाथदादा पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे
काँग्रेस आघाडीच्या भ्रष्ट सरकारला कंटाळून शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्यात भाजप-सेना युतीचा पर्याय निवडला. मात्र मागील पाच वर्षात सरकारचे धोरण बदलले नाही, शेतकरी विरोधात कायदे केले. शेतमालाचे दर पाडण्यात आले. देशात आर्थिक मंदी आली असून शेतकरी कामगार कष्टकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी कोल्हापुरात मंगळवारी शेतकरी कर्जमुक्ती परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिली. तसेच हे सर्व होत असताना देशात आणि राज्यात विरोधी पक्ष नेत्यांचे अस्तित्व दिसत नसल्याने विरोधी पक्षनेते दाखवा आणि बक्षीस मिळावा अशी घोषणाही त्यांनी यावेळी बोलताना केली.

देशातील अनेक उद्योगपती कर्ज पडून देश सोडून जात आहेत. अनेकांना कर्जात सवलत दिली जात असल्याने देश आर्थिक मंदीतून जात आहे. तर शेतकरी कामगार कष्टकरी व अन्याय होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पश्चिम महाराष्ट्र पुरात तर मराठवाडा दुष्काळाने होरपळत आहे. रिझर्व बँकेचा राखीव ठेवणे सरकारला वापरावे लागला. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले आहेत. विरोधीपक्ष दाखवा असे म्हणण्याची वेळ सर्वसामान्य जनतेवर आली आहे. दिवसेंदिवस शेतकरी कर्जबाजारी होऊ लागला आहे. त्यामुळे सरसकट करणार कर्जमाफी झाली पाहिजे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शाहू स्मारक येथे दुपारी बारा वाजता शेतकरी कर्जमुक्ती परिषद आयोजित केली आहे.

सरसकट शेतकऱ्यांना पॉलिहाऊस वीज बिलातून मुक्त करा. आपत्ती निवारण कार्यात दुष्काळ महापुराचा समावेश करून जिरायत शेतीला 50 तर बागायती शेतीला एक लाख रुपये, शेतकऱ्यांना बाजारपेठेत तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे. रेडीरेकनर प्रमाणे शेतीला कर्जपुरवठा करण्यात यावा. गाईच्या दुधाला साडेतीन फॅटला रुपये 40 तर म्हशीच्या दुधाला सहा फॅटसाठी 60 रुपये दर मिळालाच पाहिजे. उसापासून इथेनॉल निर्मिती तसेच विक्री करण्यास परवानगी मिळावी. गतवर्षी साखर कारखाना गाळपास गेलेल्या उसाला एफआरपी अधिक 200 रुपये भाव मिळाला पाहिजे. तसेच पूर बाधित शेतकऱ्यांची पाणीपट्टी माफ करण्यात यावी अशी मागणी केली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Leave a Comment