Shower Tips : उन्हातून घरी येताच अंघोळ करण्याची सवय पडू शकते महागात; होऊ शकते गंभीर समस्या

Shower Tips
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Shower Tips) गेल्या काही दिवसात बाहेरील तापमान इतके वाढले आहे की, घरातून बाहेर पडायची ईच्छा सुद्धा होत नाही. असे असताना काही काम अशी असतात जी करण्यासाठी घरातून बाहेर पडावेच लागते. मग उन्हातान्हात फिरल्यानंतर शरीराचं तापमान प्रचंड वाढतं. ज्यामुळे साहजिक आहे गरमीने जीव हैराण होतो. घामाघूम झालेलं अंग आणि त्यात उन्हाचा पारा सहन होत नाही. त्यामुळे बरेच लोक उन्हातून घरी आल्या आल्या थेट बाथरूम गाठतात आणि मस्त शॉवर घेतात. पण ही सवय आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे का? याबाबत कधी विचार केलाय? चला तर जाणून घेऊया याविषयी तज्ञ काय सांगतात.

उन्हातून घरी येताच अंघोळ केल्याने काय होत? (Shower Tips)

बऱ्याच लोकांना गरमी, उष्णता सहन होत नाही. त्यामुळे हे लोक जर कामानिमित्त उन्हात घरातून बाहेर पडले तर घरात आल्या आल्या अंघोळ करणे पसंत करतात. तुम्हालाही अशी सवय असेल तर वेळीच सावध व्हा. कारण यामुळे तुमच्या शरीराचे नुकसान होऊ शकते. ते कसे? (Shower Tips) याबाबत बोलताना तज्ञ सांगतात कि, बाहेरील उन्हामुळे शरीराचे तापमान वाढलेले असते. अशात जर तुम्ही घरात आल्या आल्या अंघोळ केलीत तर साहजिकपणे तुम्हाला आरोग्यविषयक काही समस्यांना तोंड द्यावे लागेल.

खास करून सर्दी होणे, घसा खवखवणे, ताप येणे अशा काही समस्या होण्याची शक्यता असते. उन्हातून घरी आल्यानंतर अंघोळ करणे ही सवय नक्कीच चांगली आहे. पण यासाठी तुम्हाला थोडा संयम ठेवावा लागेल. उन्हातून घरी आल्यानंतर लगेच अंघोळ करू नका. घरी येऊन अर्धा तास बस आणि त्यानंतर अंघोळ करा. (Shower Tips) तसेच जास्त वेळ शॉवर घेऊ नका. यामुळे त्वचेची जळजळ होऊ शकते. त्यातही जर तुम्ही गरम पाण्याने अंघोळ करत असाल तर तुमच्या त्वचेचे नैसर्गिक तेज निघून जाते. ज्यामुळे त्वचेत कोरडेपणा येतो आणि उष्मा पुरळ होण्याची शक्यता वाढते.

याशिवाय तज्ञ सांगतात की, तुमच्या शरीरावरील छिद्र उघडले जाऊ शकतात. तसेच जितका जास्त वेळ शॉवर घ्याल तितकेच तुमच्या शरीराचे तापमान वाढेल. शिवाय डिहायड्रेशनमुळे रक्त घट्ट होणे किंवा रक्तात गुठळ्या होणे अशा समस्या होऊ शकतात. (Shower Tips) यामुळे पल्मोनरी एम्बोलिझम होण्याची शक्यता असते. जे हृदयविकाराच्या झटक्यापेक्षासुद्धा वाईट मानले जाते.