Shravan 2024 | अगदी आठवड्याभरातच श्रावण महिना सुरू होणार आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये श्रावण महिन्याला खूप जास्त महत्त्व असते. उत्तर भारती पंचांगानुसार आता उत्तर भारतात 22 जुलैपासूनच श्रावण महिना सुरु झालेला आहे. महाराष्ट्रात 5 ऑगस्ट पासून श्रावण महिना (Shravan 2024) सुरू होणार आहे. उत्तर भारतातील पंचांगानुसार पौर्णिमेनंतरच त्यांचा महिना सुरू होतो, तर आपल्याकडे प्रचलित असलेल्या पंचांगानुसार अमावस्यानंतर नवीन महिना सुरू होतो. त्यामुळे जवळपास उत्तर भारतामध्ये आणि आपल्यामध्ये जवळपास पंधरा दिवसांनी महिना बदलतो.
महाराष्ट्रमध्ये श्रावण महिन्याला (Shravan 2024) खूप जास्त महत्त्व आहे. या महिन्यांमध्ये अनेक सण असतात. त्याचप्रमाणे व्रतवैकल्य करण्याचा हा महिना आहे. त्याचप्रमाणे भगवान शिव शंकराची उपासना करण्याचा देखील हा महिना आहे. असं म्हणतात की, या महिन्यात श्री शंकराची जर मनापासून आराधना केली, तर आपल्या इच्छा आकांक्षा नक्कीच पूर्ण होतात. या महिन्यात मांसाहार देखील वर्ज केला जातो. यामध्ये अनेक धार्मिक कारण आहेत. त्याचप्रमाणे अनेक वैज्ञानिक कारणही याबद्दल आहेत.
उत्तर भारतामध्ये श्रावण महिन्यात शिव शंकराच्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळते. या ठिकाणी कावड यात्रा देखील असतात. म्हणजेच अनेक लोक कावड खांद्यावर घेऊन जातात आणि नदीच्या पवित्र पाण्याने शंकराचा अभिषेक देखील करतात. श्रावणी सोमवारी पाळला जातो. यासोबत अनेक व्रतवैकल्य देखील केले जातात.
त्याचप्रमाणे श्रावण महिन्यात खाण्यापिण्याच्या पद्धतीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल होतो. या महिन्यात लसूण, कांदा, वांग, हिरव्या भाज्या यांचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो. अनेक कठीण नियम देखील असतात आणि अनेकजण या नियमांचे पालन देखील करतात. काहीजण श्रावणामध्ये दही दूध देखील खात नाहीत.
परंतु वैज्ञानिक कारणानुसार श्रावण महिन्यामध्ये (Shravan 2024) जोरदार पाऊस चालू असतो. ऋतू बदलल्यामुळे सगळ्याच गोष्टी बदलल्या असतात. याचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. यामुळे आपली पचन संस्था आणि रोगप्रतिकारशक्ती देखील कमकुवत झालेली असते. आणि आजारपण देखील लवकरच येतो. अशा वेळी जर तुम्ही मांसाहार केला तर त्याचे पचन होण्यास देखील जड जाते. यामुळे संसर्ग देखील होऊ शकतो. आणि आपल्या अन्न आतड्यांमध्ये कुजवू शकते. यामुळे आपल्याला गंभीर आजार होऊ शकतात.
तसेच शास्त्रीय कारणानुसार पावसाळ्यात अनेक जीवांचा प्रजननाचा काळ सुरू असतो. त्यामुळे त्यांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात. या काळात जर आपण मांसाहार केला, तर ते आपल्या शरीरासाठी नुकसानदायक असते. आणि आपल्या आरोग्याची हानी होऊ शकते. त्यामुळेच श्रावण महिन्यामध्ये अत्यंत सात्विक आणि सहज पचेल असा आहार घेतला जातो, म्हणूनच श्रावणामध्ये मांसाहार वर्ज करतात.