श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका! प्रकृतीविषयी मोठी अपडेट समोर

shreyas talpade
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| गुरुवारी अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला असल्याची बातमी समोर आली. या बातमीमुळे चाहत्यांच्या हृदयांचा ठोका चुकला होता. मात्र आता श्रेयस तळपदे यांच्या तब्येतीविषयी एक मोठी अपडेट समोर आली आहे. श्रेयस तळपदेवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी आता त्याची प्रकृती ठीक असल्याचे सांगितले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या या माहितीमुळे चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे.

श्रेयस तळपदेची अँजिओप्लास्टी

गुरुवारी श्रेयस तळपदे मुंबईत वेलकम टू जंगल सिनेमाचे शूटिंग करत होता. सिनेमाचे शूटिंग संपल्यानंतर तो आपल्या घरी पुन्हा आला. पण घरी आल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. यानंतर लगेच त्याच्या पत्नीने त्याला अंधेरीतील बेलव्ह्यू रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर श्रेयसच्या छातीत ब्लॉक असल्याचे आढळून आले. यानंतर लगेच त्यांनी अँजिओप्लास्टी केली. महत्त्वाचे म्हणजे डॉक्टरांनीही अँजिओप्लास्टी त्याला हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच केली आहे. अँजिओप्लास्टी केल्यानंतर श्रेयस सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. पुढील दोन दिवसांमध्ये त्याला डॉक्टरांकडून डिस्चार्ज देखील देण्यात येईल.

दरम्यान, श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आला अशी बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली होती. या बातमीमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. मात्र आता डॉक्टरांनी त्याच्या प्रकृती विषयी माहिती दिल्यानंतर सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. तसेच आता श्रेयसने पूर्णपणे आराम करावा, असा सल्ला चाहत्यांकडून देण्यात आला आहे.