बीसीसीआयने पोस्ट केलेल्या विराट कोहलीच्या फोटोने इंस्टाग्रामवर केली ‘हवा’; श्रेयस अय्यर म्हणतो..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना बेसिन रिझर्व येथे खेळाला जात आहे. या कसोटी सामन्यातील दोन दिवसांचा खेळ पार पडला आहे मात्र, आम्ही तुम्हाला या सामन्यापूर्वी घडलेल्या एका खास गोष्टीबद्दल सांगणार आहोत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याआधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआयने) त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर विराट कोहलीचा मैदानावरील एक अफलातून फोटो पोस्ट केला होता. तसेच बीसीसीआयने चाहत्यांना या फोटोला योग्य कॅप्शन सुचवायला सुद्धा सांगितले. दरम्यान विराटच्या मैदानावरील या फोटोला प्रतिसाद देत चाहत्यांनी कंमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.

एका चाहत्याने विराटच्या फोटोला कॅप्शन देत लिहिले,’हवा के साथ और ऊपर जाओ’, तर दुसर्‍या चाहत्याने लिहले, ‘क्या आप सोचते हैं कि हवा हमें रोक सकती है. हवा हमें ट्रॉफी दिलाने जा रही है.’ त्याचवेळी दुसर्‍या चाहत्याने लिहिले की,”शेर की तरह खेलो, मराल चिड़िया की तरह नाचो.” अशाचप्रकारे विराटच्या बर्‍याच चाहत्यांनी त्याच्या फोटोवर आपले कॅप्शन लिहिले.

मात्र, भारतीय संघाचा फलंदाज श्रेयस अय्यरने आपल्या कर्णधाराबद्दल असं कॅप्शन लिहले ज्यामुळं त्याने सगळ्यांना मागे टाकलं. फोटोमधील विराटच्या कॅन्डीड पोझला कॅप्शन देत अय्यरने लिहिले….’कि घंघुरू टूट गए.’ मुळात अय्यर आणि विराटची फोटोमधील पोझ बॉलीवूड सिनेमातील एका डान्स नंबर मधील स्टेप्सशी साधर्म्य दाखवत असल्यानं अनेकांना अय्यरचे कॅप्शन आवडत आहे. अनेक चाहत्यांनी त्याच्या कॅप्शनला उत्फुर्त प्रतिसाद दिला आहे.


View this post on Instagram

 

Let’s put on our thinking caps and caption this? The best one will feature right here. Go.Go.Go #NZvIND

A post shared by Team India (@indiancricketteam) on Feb 20, 2020 at 3:24pm PST

 

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.