बेळगावचे ‘श्रीनिवास ठाणेकर’ झाले पुन्हा एकदा अमेरिकेचे खासदार

0
303
shri thanedar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – भारतीय-अमेरिकन उद्योजक श्रीनिवास ठाणेदार (shri thanedar) हे अमेरिकेच्या मिशिगन राज्यातून मध्यावधी निवडणुकीत विजयी झाले आहेत. श्रीनिवास ठाणेदार (shri thanedar) हे सध्या मिशिगन हाऊसमधील तिसऱ्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत आहेत. ते मूळचे बेळगावचे आहेत. ते अनेक वर्षांपासून अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. या निवडणुकीत श्रीनिवास ठाणेदार यांना 84,096 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी बिविंग्स यांना 27,366 पेक्षा जास्त मते मिळाली आहेत.

श्रीनिवास ठाणेदार (shri thanedar) हे यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये निवडून आलेले चौथे भारतीय-अमेरिकन बनले आहेत. याअगोदर राजा कृष्णमूर्ती, रो खन्ना आणि प्रमिला जयपाल हे यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये निवडून आले होते.

कोण आहेत श्रीनिवास ठाणेदार?
श्रीनिवास ठाणेदार (shri thanedar) यांचा जन्म शहापूरमधील मिरापूर गल्लीत झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सरकारी शाळेत झाले. त्यांनी चिंतामणराव हायस्कूलमधून दहावी उत्तीर्ण केली. यानंतर त्यांनी 1977 मध्ये मुंबई विद्यापीठातून त्यांनी मास्टर्स डिग्री मिळवली. त्यानंतर डॉ. ठाणेदार 1979 मध्ये अमेरिकेत स्थलांतरित झाले. तिथे 1982 मध्ये त्यांनी पॉलिमर केमिस्ट्रीत पीएचडी संपादन केली. 1984 ते 1990 या कालावधीत त्यांनी सेंट लुईसमधील पेट्रोलाईट कॉर्पोरेशनमध्ये पॉलिमर सिंथेसिस केमिस्ट आणि प्रकल्पप्रमुख म्हणून काम पाहिले होते.

हे पण वाचा :
अंधेरीचा पहिला झटका … मशाल पेटली; सामनातून भाजपवर टीकेचा बाण
जालन्यामध्ये आयशर आणि रिक्षाचा भीषण अपघात! 5 जणांचा जागीच मृत्यू
5 रुपयांच्या ‘या’ नोटेद्वारे अशा प्रकारे मिळवा लाखो रुपये
Honda पुढील महिन्यात ACTIVA Electric करणार लाँच, जाणून घ्या फीचर्स, किंमत अन् बरंच काही…
VIP मोबाईल नंबर ‘फ्री’ मध्ये मिळवण्याची संधी