आपल्या अदाकारीने अनेकांची शिकार करणार्या श्रीदेवी ची आज जयंती

Shridevi biography
Shridevi biography
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जिच्या अदाकारी आणि नृत्याची शिकार देशाच्या दोन पिढया झाल्या. नितळ सौंदर्याच्या नैसर्गिक प्राप्तीच बावन्न कशी सोन ज्यांनी अविरत चमकवत ठेवलं, त्या श्रीदेवी आज आपल्यात नाहीत. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी श्रीदेवींच्या मृत्यूची बातमी येऊन धडकली. या अशा बातमीची कुणी सुध्दा अपेक्षा केली नव्हती. बॉलिवूडची चांदणी हरपल्याची भावना जनमानसात तीव्र दुःखासह उमटत होती. श्रीदेवींची आज जयंती आहे त्या निमित्त त्यांच्या जीवनाचा आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न.

इतर महत्वाचे लेख –

जॅकलिन बद्दलच्या या गोष्टी वाचून तुम्हालाही धक्का बसेल

इंटरनेटवर मुली सर्वाधिक काय सर्च करतात ? वाचून तुम्हालाही धक्का बसेल

१३ ऑगस्ट १९६३ साली तामिळनाडूतील शिवकाशीत श्रीदेवी यांचा जन्म झाला. आपले मूळ नाव त्यागून लोकांना सहज तोंडवळणी पडेल असे नाव धारण करण्याचा प्रगाद भारतीय चित्रपट सृष्टीत जुना आहे. त्याप्रमाणेच अम्मा ययंगर आय्यप्पन् या मूळ नावात बदल करून श्रीदेवी हे नाव त्यांनी धारण केले. श्रीदेवी यांचे वडील पेशाने वकील होते.

बालकलाकार म्हणून श्रीदेवी यांनी पहिल्यांदा थुनाईबन या तेलगू चित्रपटात काम केले (१९७४) तिथं पासून २०१७ सालच्या मॉम या चित्रपटपर्यंत त्यांनी असंख्य चित्रपटांत काम केले. मुमरू मुदीचू या तामिळ चित्रपटात सुप्रसिद्ध दिग्ददर्शक के.बालाचंदर यांनी श्रीदेवी यांना पहिल्यांदा मुख्यनायिकेची भूमिका दिली. या चित्रपटात दाक्षिणात्य चित्रपटातील थोर नायक सध्या जे राजकीय सुर्कीयामध्ये अधिक आले आहेत असे रजनीकांत आणि कमल हसन नायकांच्या भूमिकेत होते. हा चित्रपट लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला.

कारकिर्दीच्या चढत्या अलेखा सोबत श्रीदेवी यांना मुंबई खुणावू लागली. त्या हिंदी चित्रपटात झळकू लागल्या त्या कायमच्याच हिंदीच्या झाल्या. सोलावा सावन या चित्रपटापासून त्यांनी हिंदी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. कर्मा, नगीना, मवाली, मिस्टर इंडिया, चालबाज, लमहें आशा असंख्य चित्रपटासोबत त्यांनी बऱ्याच अंतराने २०१२ साली इंग्लिश बिग्लिश चित्रपटात बेतोड काम केले. २०१७ साली त्यांनी मॉम या शेवटच्या ठरलेल्या चित्रपटात काम केले.

२४ फेब्रुवारी २०१८ श्रीदेवी यांचे दुबई मध्ये निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. बोनी कपूर यांच्याशी विवाहबद्ध झालेल्या श्रीदेवी यांना जानकी आणि खुशी या दोन मुली आहेत. तसेच अर्जुन कपूर हा त्यांचा सावत्र मुलगा आहे.

सुरज शेंडगे