मोठी बातमी!! कल्याण लोकसभेसाठी फडणवीसांनी जाहीर केला उमेदवार

fadnavis shrikant shinde
fadnavis shrikant shinde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य राहिलेल्या कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी (Kalyna Lok Sabha 2024) भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठी घोषणा केली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हेच उमेदवार असतील, त्यांना आम्ही मोठ्या मताधिक्याने निवडून आणू असं फडणवीस यांनी म्हंटल आहे. नागपूर इथं भाजपच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे कल्याण लोकसभेच्या उमेदवारीचा सस्पेन्स संपला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, श्रीकांत शिंदे यांना भाजपकडून विरोध नाही. श्रीकांत शिंदे हे कल्याणमधून शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत, ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भाजप त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहणार आहे. पूर्ण ताकदीनं आणि मागच्यावेळपेक्षा जास्त मतांनी श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून आम्ही सर्वजण विजयी करू. फडणवीसांच्या या घोषणेनंतर श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळं या कल्याण लोकसभा मतदारसंघात आता शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे विरुद्ध ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर राणे यांच्यात सामना पहायला मिळणार आहे.

गणपत गायकवाड यांनी केला होता विरोध –

दरम्यान, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण लोकसभेसाठी श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. काल गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते, तसेच आमदार गायकवाड यांच्या समर्थकांची एक बैठक पार पडली. जर कल्याणमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंना उमेदवारी दिली गेली तर भाजपचा एकही कार्यकर्ता त्यांच्यासाठी काम करणार नसल्याची आक्रमक भूमिका यावेळी घेण्यात आली. शिंदे उमेदवार असल्यास काम करणार नसल्याचा ठराव देखील भाजच्या कार्यकत्यांनी संमत केल्याची सूत्रांची माहिती दिली आहे. आता फडणवीस यांच्या घोषणेनंतर गणपत गायकवाड यांच्यासहित स्थानिक भाजप कार्यकर्ते काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.