हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरण कमामुळे परिसरातील शेतकर्यांना अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी योग्य नियोजनाने रुंदीकरणाचे काम पूर्ण करावे, पूलाची कामे, सेवा रस्त्याला पडलेले खड्डे, होणारी वाहतूक कोंडी त्या-त्यावेळी सोडवाव्यात. कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूलाचे काम करताना नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. मलकापूर, कोल्हापूर नाका, वारूंजी फाटा येथे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी कामाचे योग्य नियोजन करावे, अशा महत्वाच्या सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
खा. श्रीनिवास पाटील यांनी कराड येथे नुकतीच महामार्गाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी शेंद्रे ते मालखेड या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. या बैठकीस महामार्ग प्रकल्प व्यवस्थापक वसंत पंदरकर, डीपीजैन कंपनीचे मॅनेजर प्रदीप जैन यांच्यासह वाहतूक शाखेचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी खा. श्रीनिवास पाटील म्हणाले की, शेंद्रे ते मालखेड या दरम्यान महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम अधिकाऱ्यांनी लवकर पूर्ण करावे. हा रस्ता तयार होत असताना बाजूच्या शेतकऱ्यांना अडचणी येत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे शेतीचे नुकसान, शेतमाल वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. महामार्गावर ज्या-ज्या ठिकाणी पूल बांधण्यात येणार आहेत त्यावर विद्युतीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचीही तरतूद अधिकाऱ्यांनी करावी.
इंदोली येथील पूल उतरल्यानंतर महामार्ग ते सर्व्हिस रस्ता जोडताना योग्य ती खबरदारी घेतली गेलेली नाःई. त्यामुळे याठिकाणी अपघात होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. त्यामुळे येथे तात्काळ उपाययोजना कराव्यात. सहापदरीकरणाच्या कामामुळे सर्व्हिस रोडची उंची वाढली आहे. परिणामी शेतकऱ्यांना शेतमाल काढता येत नाही. त्यामुळे सर्व्हिस रोडची योग्य उंची ठेवावी. ऊसतोड हंगामामध्ये ऊस तोडणी करून साखर कारखान्याकडे जाणारी वहातूक वाढल्याने वाठार येथे मोठया प्रमाणात वहातूक कोंडी होऊन वहानांच्या रांगा लागतात. त्यावर उपाययोजना आखाव्यात.
कराड ते रत्नागिरी रस्त्याजवळ पाचवड फाट्यानजीक महामार्गावरील पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच येथील पेट्रोल पंपानजिक सर्व्हिस रस्त्यावर पाणी सतत साठून रहाते. याचा सर्व्हे करून उपाय करावा. नारायणवाडी आटके टप्पा येथील रेगेचा ओढा येथे पाईप पूल ऐवजी ओपन बॉक्सचा पूल बांधण्यात यावा. शेद्रे ते खिंडवाडी पर्यंत महामार्ग खचत आहे. त्यामुळे हा ३ किमीचा भाग कॉंक्रिटीकरण करावा.
उंब्रज, अतित, नागठाणे येथे नवीन पूल उभारावेत : पाटील
उंब्रज, अतित, नागठाणे येथे रस्ता ओलांडताना अपघात होतआहेत. त्यामुळे याठिकाणी नवे पुल बांधण्यात यावेत, अशी महत्वाची सूचना श्रीनिवास पाटील यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केली. यावर नवीन पूल बांधण्याबाबत प्रस्ताव तयार करून कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही महामार्ग अधिकाऱ्यांनी या