‘ज्याने मोठं केलं त्यालाच उदयनराजे विसरले’; श्रीनिवास पाटील यांची निकालानंतरची प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा पोटनिवडणूकीत भाजपच्या उदयनराजे भोसले यांचा दणदणीत पराभव करत श्रीनिवास पाटील विजयी झाले आहेत. हा जनतेच्या विश्वासाचा आणि प्रेमाचा विजय असून ज्या व्यक्तीने आपल्याला मोठं केलं त्या व्यक्तीलाच उदयनराजे विसरले, आणि याचाच फटका त्यांना बसला असल्याचं श्रीनिवास पाटील म्हणाले.

दरम्यान, शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन पाटील यांच्या विजयाबाबत आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले कि,’लोकसभेच्या एका जागेवर श्रीनिवास पाटील विजयी झाले आहेत ही लोकशाहीसाठी खूप आश्वासक बाब आहे. ज्या राजाला जनतेच्या मतांची किंमत नसते त्याचे हाल काय होतात हे तुम्ही पाहिलंच आहे असं सांगत श्रीनिवास पाटील यांना निवडून दिल्याबद्दल सातारकर जनतेचे आभार शरद पवारांनी मानले. उद्या साताऱ्यात जाऊन श्रीनिवास पाटलांचा सत्कार करणार असल्याचं शरद पवार यांनी यावेळी सांगितले.