सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कोरोना व्हायरसने सध्या जगभर थैमान घातले आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या ३४२ वर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी २२ मार्च च्या दिवशी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. यामुळे देशात सर्वत्र शुकशूकाट असून वर्क फ्रोम होम पद्धतीने काम चालले आहे. सातार्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनीही वर्क फ्रोम होमचा पर्याय निवडला आहे.
‘स्वतःसहित कुटुंबातील सर्वांच्या तब्येतीची काळजी घ्या. घराबाहेर पडू नका’ असे आवाहन खासदार पाटील यांनी नागरिकांना केले आहे. तसेच काळजी घ्यायची पक्के ठरवू! आपण कोरोनाला नक्की हरवू! असे म्हणत खासदार पाटील यांनी जनतेला स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सारंग पाटील यांनीही वर्क फ्रोम होमचा पर्याय निवडत आपल्या मुलांसोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा आपल्या मातोश्री बंगल्यावरुन वर्क फ्रोम होम करत आहेत. ते आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही ट्विट करत मी पण घरी आहर, तुम्ही पण घरीच रहा असे सांगितले आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना पोझिटीव्ह रुग्ण सापडलेला नाही. शनिवारी सातारा येथे एक कोरोना संशयित सापडला असून त्याचे रिपोर्ट पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. राज्यात आत्तापर्यंत ७४ कोरोना पोझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर देशात कोरोना रुग्नांची संख्या ३४२ वर पोहोचली आहे.