हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा लोकसभा निवडणुकीत ( Satara Lok Sabha Election 2024) उमेदवारांची यादी जाहीर होण्यापूर्वीच मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. साताऱ्याचे विद्यमान खासदार आणि शरद पवार गटाचे नेते श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. तब्ब्येतीचे कारण देत श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार ( Sharad Pawar) आज सातारा दौऱ्यावर असून त्यांनीच प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याबाबत माहिती दिली. श्रीनिवास पाटील यांच्या या निर्णयामुळे शरद पवार आणि सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत सस्पेन्स वाढला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, शरद पवार म्हणाले, श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवावी, अशी आमची इच्छा होती. परंतु प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला. आरोग्यामुळे न्याय देऊ शकणार नाही. त्यामुळे लढण्यात अर्थ नाही. पण पक्ष सांगेल ते काम मी करेल. मला निवडणुकीच्या प्रक्रियेतून मुक्त करा, असं श्रीनिवास पाटील यांनी सांगितलं. त्यामुळे मी मुद्दाम साताऱ्यात येऊन तुमच्याशी संवाद साधत आहे असं शरद पवार यांनी म्हंटल.
जेव्हा जेव्हा पवार अडचणीत तेव्हा तेव्हा श्रीनिवास पाटलांनी दिली साथ
खरं तर श्रीनिवास पाटील हे शरद पवार यांचे जिवलग मित्र आहेत. शरद पवारांच्या शब्दाखातर त्यांनी सनदी अधिकाऱ्यांची नोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला होता. जेव्हा जेव्हा शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत आली तेव्हा तेव्हा श्रीनिवास पाटील पक्षासाठी धावून आले. यापूर्वी १९९९ आणि २००४ ला ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदार झाले, त्यानंतर पवारांनी श्रीनिवास पाटील यांची सिक्कीमच्या राज्यपाल पदी नियुक्ती केली. मात्र २०१९ मध्ये राष्ट्रवादीचे तत्कालीन खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडत शरद पवारांनाच आव्हान दिले होते. अशावेळी पुनः एकदा श्रीनिवास पाटील शरद पवारांच्या मदतीला धावून गेले आणि सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंना धूळ चारली. त्यामुळे यंदाही श्रीनिवास पाटील यांचेच तिकीट फिक्स होते.
परंतु मागील काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यातीलच काही नेत्यांचा श्रीनिवास पाटलांना बातम्या पसरत होत्या. एकीकडे सध्या महाराष्ट्राच्या एकूण राजकारणात निष्ठावान कार्यकर्त्यांची वाणवा असताना श्रीनिवास पाटील यांच्या सारख्या हुशार, अभ्यासू, एकनिष्ठ आणि पवारांवर प्रेम असणाऱ्या नेत्याला विरोध करणं म्हणजे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीची ताकद आपल्याच हाताने कमी करणे तर नाही ना अशा चर्चा सर्वसामान्य लोकांच्यात सुरु झाल्यात. एवढच नव्हे तर आता श्रीनिवास पाटील यांच्या माघारीनंतर त्यांचे सुपुत्र सारंग पाटील याना शरद पवार लोकसभेचे तिकीट देणार का हे सुद्धा आता पाहावं लागेल.