शरीरसंबंध हा प्रेमबंधाचाच भाग, त्यासाठी वाट पाहता येते | Film Review #3

0
90
Shubh Mangal Saavdhan movie review in marathi
Shubh Mangal Saavdhan movie review in marathi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
परिक्षण – घनश्याम येणगे

“मर्द को कभी दर्द नही होता” अशी हिंदीमध्ये एक म्हण आहे. परंतु या ‘मर्द’ पणाच्या भोवतीचे प्रश्‍न हलक्या फुलक्या व मजेदार पद्धतीने सांगुन ‘शुभ मंगल सावधा’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या आयुष्यमानने मर्द असण्याची नवीच व्याख्या सांगीतली आहे. त्याच्या मतानुसार ‘मर्द तो असतो जो ना दर्द देतो ना कुणाला दर्द द्यायला लावतो’

इतर महत्वाचे –

देऊळ – मार्मिक सत्य मांडणारा चित्रपट   

B.A. पास

शुभमंगल सावधान या चित्रपटाची वाट निसरडी होती कारण लग्न हा विषय आपल्या खूप जवळचा असला तरी सेक्स या विषयावर आपल्याकडे तितके मोकळेपणाने बोलले जात नाही. दिग्दर्शक आर. एस. प्रश्‍न्ना यांनी कुठेही बटबटीतपणा न दाखवता चित्रपटात उत्तम तोल साधला आहे. त्यांना सर्वच कलाकारांनी उत्तम साथ दिली आहे.

चित्रपटात दिल्लीतील मुदित शर्मा (आयुष्यामन खुराणा) ची गोष्ट आहे, ज्याचा साखरपुडा दिल्लीतल्याच सुगंधा (भूमी पेडणेकर) सोबत होतो. साखरपुडा आणि लग्न यांच्यादरम्यान मुदित आणि सुगंधा एकमेकांच्या जवळ येतात तेंव्हा त्यांना कळते की मुदितला सेक्सुअल प्रॉब्लम आहे. आणि हे कळल्यानंतर सुगंधाचे पालक लग्नाला विरोध करतात परंतु सुगंधा आणि मुदित एकमेकांवर प्रेम करत असतात आणि त्यांनी काहीही झाले तरी लग्न करायचे आहे. असे ठरवतात. लग्न वाराणसीला होणार असते. तिथे निघण्या आधी मुदित सुगंधला लग्न मोडण्याविषयी सांगतो. त्याचा तो प्रश्‍न पुढे दोघांनाही खुप त्रासदायक ठरेल, अशी त्याची भूमिका असते. सुगंधा मात्र त्याला ठाम नकार देते, हा प्रश्‍न लग्नानंतर समजला असता, तो माझ्याबाबत असता तर असा प्रश्‍न त्याला विचारते.

अशा प्रश्‍नोत्तरांतून दिग्दर्शक अनेक बाबींवर बोट ठेवत जातो. दोष माझ्यात आहे, तर उपाय सुगंधाबाबत का? असा थेट प्रश्‍न विचारत मुदित केळीच्या झाडाशी लग्न करतो, तेव्हा नक्की पुरूषत्व मर्दपणा कशामध्ये आहे हे न बोलता सांगतो. आपल्या या प्रश्‍नाला घेऊन मुदीत वैदुंपासून बंगाली बाबांपर्यंत अनेकांच्या सल्ल्यांपासून ते थेट पशुवैद्यक डॉक्टरांपर्यंत संगळ्यांकडे जातो. परंतु हा प्रश्‍न तज्ञ डॉक्टरांकडे घेऊन जावा असे ना त्याला वाटते ना त्याच्या मित्रांना! या सगळ्यांमध्ये रूसवे – फुगवे, समज – गैरसमज आणि मजेशीर घटना घडत जातात यात या दोघांचे लग्न होते की नाही हे तुम्ही प्रत्यक्ष पाहिले चांगले.

हा विषय अतिशय नाजूक असला तरी दिग्दर्शक आर. एस. प्रसन्ना यांनी खुप चांगल्या प्रकारे मांडला आहे. हा चित्रपट पाहताना आपल्याला कुठेच तो व्हल्गर वाटू नये याची काळजी घेतली आहे. चित्रपट खरे तर २०१३ मध्ये आलेल्या तमिळ चित्रपट कल्याण समायल साधम याचा हिंदी रिमेक आहे. तमिळ चित्रपटाचे दिग्दर्शक ही प्रसन्नाच होते.
चित्रपट समाजाचा आरसा असतो आणि समाजवर चित्रपटांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर पडतो. म्हणूनच हा चित्रपट पाहणार्‍या युवक- युवतींवर समाजामध्ये बोलल्या न जाणार्‍या एका अशा विषयावर जागृती वाढेल असे वाटते. शरीरसंबंध हा प्रेमबंधाचा एक भाग आहे. त्यासाठी वाट पाहता येते. प्रेमबंध महत्वाचा असतो. तो असला की, कशावरही मात करता येते. असे अजिबात भाषण बाजी न करता या चित्रपटात सांगीतले आहे. हि विशेष बाब सुगंधाचे ठाम राहणे, मुदितला मदत करणे या दोघांनीही इतर कोणाहीपेक्षा एकमेकांना काय वाटते याला महत्व देणे हे अतिशय सुंदर, चित्रपटातील आईने मुलीशी सेक्सबद्द साधलेल्या संवाद, घरात ब्लू फिल्मची सिडी मिळाल्यानंतर झालेला हाहाकार, लग्नाच्या आदल्या दिवशी मुला- मुलीला एकत्र राहण्याची घरातल्यांनी दिलेली परवानगी ही दृश्य प्रेक्षकांना नक्कीच खळखळून हसवतात. सेक्स, नपुसंकत्व या गोष्टीवर विनोदी पण मार्मिक रितीने या चित्रपटाद्वारे भाष्य करण्यात आले आहे.

कलाकारांचा अभिनय ही चित्रपटाची सर्वात उत्तम बाजू अतिशय वेगळ्या प्रकारच्या भूमिका आयुष्यमान अतिशय उत्तमरित्या निभावतो हे त्याने अजुन एकदा सिद्ध केले. भूमी पेडणेकर हा तिसराच चित्रपट अतिशय बोलक्या डोळ्यांची ही सुंदर अभिनेत्री आपल्याला खुप लांबचा टप्पा गाठायचा आहे हे पटवून देते. सुगंधाच्या आईची भूमिका साकारणार्‍या सीमा पहावा उत्तम. त्यांच्या सोबतच ब्रीजेंद्र काला यांनाही पैकीच्या पैककी गुण दिले पाहिजेत. चित्रपट शेवटाकडे थोडा रेंगाळतो हे सोडले तर चित्रपटात कमी दाखवण्यासारखे काही नाही. एक निखळ मनोरंजन आणि वेगळा विषय तसेच कलाकारांच्या अभिनयासाठी हा चित्रपट पाहण्यास कांही हरकत नाही.

चित्रपट – शुभ मंगल सावधान
वेळ – १ तास ४८ मिनिट
दिदर्शक – आर. एस. प्रसन्ना

कलाकार – आयुष्यमान खुराणा, भुमी पेडणेकर, ब्रीजेंद्र काला, सीमा पाहवा.

n

घनश्याम येणगे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here