मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएल 2022 मध्ये काल गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायन्ट यांच्यात अत्यंत चुरशीचा सामना झाला. या सामन्यात गुजरात टायटन्सच्या शुभमन गिलने (Shubhaman Gill) शानदार खेळी खेळली आणि 63 धावा करून नाबाद राहिला. शुभमन गिल (Shubhaman Gill) या हंगामात उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. तसेच तो त्याच्या संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. शुभमन गिलने मंगळवारी लखनऊ सुपर जायन्ट विरुद्ध 49 चेंडूत 63 धावा केल्या. या डावात त्याने 7 चौकार मारले आणि संपूर्ण 20 षटके क्रीजवर टिकून राहिला.
आयपीएलच्या इतिहासात ही दुसरी वेळ आहे, जेव्हा एखाद्या खेळाडूने संपूर्ण 20 षटके फलंदाजी केली आणि एकही षटकार मारला नाही. शुभमन गिलच्या आधी सचिन तेंडुलकरने ही कामगिरी केली आहे. सचिन तेंडुलकरने 2009 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध अशी कामगिरी केली होती. आता शुभमन गिलने 2022 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध ही कामगिरी केली आहे.
शुभमन गिलच्या (Shubhaman Gill) फॉर्मबद्दल बोलायचे झाले तर या मोसमात आतापर्यंत त्याने 12 सामन्यात 384 धावा केल्या आहेत. यात चार अर्धशतकांचा समावेश आहे, तर त्याची सरासरी 35 च्या आसपास आहे. गिलने आयपीएलमध्ये आतापर्यंत 40 चौकार, 9 षटकार मारले आहेत. IPL 2022 मध्ये सर्वाधिक अर्धशतक ठोकण्याच्या बाबतीत शुभमन गिलने डेव्हिड वॉर्नरची बरोबरी केली आहे. डेव्हिड वॉर्नर आणि शुभमन गिलने या मोसमात 4-4 अर्धशतके केली आहेत.
हे पण वाचा :
अहो आश्चर्यम !! एकही नट-बोल्ट न वापरता बनवला आहे ‘हा’ ब्रीज
साताऱ्याचे जवान सुधीर निकम मुंबईत कर्तव्य बजावताना शहीद
SBI ने ‘या’ डिपॉझिट्सवरील व्याजदरात केली 0.90% पर्यंत वाढ
‘या’ रोपाची लागवड करून मिळवा 5 पट नफा; लगेच सुरु करा
Honda N7X : होंडाची ‘ही’ नवीन SUV देणार Mahindra XUV700 ला तगडी फाईट