Ind Vs Nz : शुभमन गिलचे धडाकेबाज शतक; भारताचा स्कोर 200 पार

Shubaman Gill
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात भारताचा आक्रमक सलामीवीर शुभमन गिल याने धडाकेबाज शतकी खेळी खेळली आहे. मागील महिन्यातच त्याने एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावले होते. तोच फॉर्म त्याने कायम ठेवत आज शतकी खेळी केली आहे.

भारताचा कर्णधार हार्दिक पंड्या याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर ईशान किशन अवघ्या 1 धावेवर बाद झाला मात्र, दुसरा सलामीवीर शुभमन गिलने चौफेर फटकेबाजी करत दणदणीत शतक ठोकले. अवघ्या ५४ चेंडूत त्याने शतकी खेळी केली. या खेळीदरम्यान गिलने १० चौकार आणि ५ गगनचुंबी षटकार ठोकले. आत्ता १६ व्या षटकांपर्यत भारताची धावसंख्या २०० पार झाली आहे.

गिलव्यतिरिक्त राहुल त्रिपाठी आणि सूर्यकुमार यादव यांनीही चांगली खेळी केली. राहुल त्रिपाठीने २२ चेंडूत ४४ तर सूर्यकुमार यादवने १३ चेंडूत २४ धावा बनवल्या. सध्या गिलसोबत कर्णधार हार्दिक पंड्या मैदानात असून तो सुद्धा १३ चेंडूत २७ धावांवर खेळत आहे.