खऱ्या खोट्याचा बाजार! श्वेता तिवारीने पतीकडून झालेल्या छळाचा व्हिडीओ केला वायरल; पतीने केला पलटवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री श्वेता तिवारीने २०१३ साली अभिनव कोहली सोबत दुसरे लग्न केले होते. त्या दोघांना रेयांश नावाचा लहान मुलगा देखील आहे. मात्र त्यांचे परस्परांतील संबंध अत्यंत खराब झाल्याने ते दोघेही विभक्त झाले. २०१९ मध्ये कायदेशीररित्या दोघेही वेगळे झाले. मात्र आज २०२१ मध्येही त्यांच्यातील वाद काही संपेना. श्वेता आणि अभिनवमध्ये ब-याच काळापासून मुलगा रेयांशच्या कस्टडीसाठी वाद सुरु आहेत. दरम्यान श्वेताचे आगामी शोच्या शूटसाठी बाहेरगावी जाणे अभिनवच्या पत्त्यावर पडले आणि त्याने सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ घातला. त्यानंतर अभिनवणे केलेल्या वादग्रस्त विधानांवर संतापात श्वेतानेही त्याला सडेतोड उत्तर दिले. तर आता अभिनवच्या घृणास्पद कृत्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यात श्वेतासह तो मुलाचाही छळ करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. मात्र त्यावरही अभिनवने पुन्हा प्रत्युत्तर देणारा व्हिडीओ शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/COse27-N2Ej/?utm_source=ig_web_copy_link

घटस्फोटानंतर मुलगा रेयांश श्वेताकडेच राहत आहे. मात्र मुलाने माझ्याकडेच राहावे अशी इच्छा अभिनवने व्यक्त केली होती. पण तो मुलाचा योग्य सांभाळ करु शकत नसल्याचे श्वेताने म्हटले आहे. मात्र अभिनव अधून मधून मुलाला भेटण्यासाठी घरी येत जात असतो. मात्र त्यावेळीही तो असा काय वागतो की, त्याला भेटायला मुलगा घाबरतो असे तिने सांगितले आहे. अभिनवने कशा प्रकारे तिच्या सोसायटीत येऊन गोंधळ घातला होता हे दाखवणारे सीसीटीव्ही फुटेजच तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. घडलेल्या या प्रकारामुळे मुलगा रेयांश इतका घाबरला होता की, तो रात्री झोपतानाही घाबरायचा असेही तिने म्हटले आहे. अभिनवचे खरे रुप जगासमोर यावे म्हणून श्वेताने हा व्हिडीओ शेअर केला आहे. काही वेळानंतर हा व्हिडीओ डिलीट करणार असल्याचे तिने म्हटले आहे. फक्त सत्य काय आहे ही लोकांना समजावे यासाठी हा पुरावा शेअर करत असल्याचे तिने म्हटले आहे.

https://www.instagram.com/tv/COlGqLFnuEU/?utm_source=ig_web_copy_link

गेल्या काही दिवसांपासून श्वेता आणि तिचा पती अभिनव कोहली यांच्यातला कौटुंबिक वाद जगासमोर आला आहे. सातत्याने दोघांच्या एकमेकांना प्रत्युत्तर केल्याच्या बातम्या येत आहेत. नुकताच आपल्या मुलाला मुंबईतील एका हॉटेलमध्ये ठेऊन ‘खतरों के खिलाडी’ या शोसाठी श्वेता केपटाऊनला निघून गेली, असा आरोप अभिनवने तिच्यावर केला होता. तर कोरोना काळात मुलाला असे एकटं सोडणं कितपत सुरक्षित आहे असा प्रश्न तिच्याबाबत उपस्थित केला होता. यावर श्वेताने त्याला सडकून उत्तर दिले होते. मात्र अभिवनचा तमाशा काही संपता संपेना.

https://www.instagram.com/tv/COnBW26HiZw/?utm_source=ig_web_copy_link

अभिवने श्वेताबाबत बोलताना म्हटले होते कि, तुला फक्त पैसे कमवायचे आहेत. पैसा कमवणे इतके महत्त्वाचे होते तर मुलाला माझ्याकडे सोडून जायचे होते.अभिनवच्या आरोपांवर श्वेतानेदेखील तीव्र प्रतिक्रिया दिली होती. अभिनव मुलांच्या खर्चासाठी एक पैशाची मदत करत नाही.” असा आरोप श्वेताने केला होता.

https://www.instagram.com/tv/COs-eUzHgU1/?utm_source=ig_web_copy_link

श्वेता तिवारीच्या या आरोपांनतर अभिनवने पुन्हा एकदा एक व्हिडिओ शेअर करत श्वेताने केलेला दावा खोटा असल्याचे म्हटले होते. ज्यात त्याने आपल्या मोबाईलमधील मुलासोबतचे व्हिडीओ दाखविले आहेत. सोबतच रडत रडत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आता एकंदर हे पाहता, कोण खरे कोण खोटे हे सांगणे अवघड असले तरीही या पती पत्नीच्या भांडणात त्या निष्पाप मुलाचा काय दोष?  हा प्रश्न मात्र उपस्थित राहतो आहे.

Leave a Comment