सोलापूर प्रतिनिधी । देशाच्या माजी गृहमंत्र्यांना पराभूत करून थाटात सोलापूरची खासदारकी मिळवलेल्या सिद्धेश्वर महाराज यांची खासदारकी धोक्यात आली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जातीचं खोटं प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी जयसिद्धेश्वर महाराज यांना खासदारकी गमवावी लागू शकते. यासंदर्भातील गोपनीय माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली असून १८ जानेवारीला यासंदर्भातील योग्य ती कागदपत्रे न्यायालयात सादर करण्याचे आदेश सिद्धेश्वर महाराज यांना देण्यात आले आहेत.
मतदारसंघातील जातीय समीकरणांचा विचार करुन सिद्धेश्वर महाराज यांना भाजपने तिकीट दिल्याचं बोललं जात होतं. मात्र आता जात प्रमाणपत्राची वैधता वादात सापडल्यामुळे विद्यमान खासदार अडचणीत आले आहेत. याठिकाणी वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांनी तर काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे यांनी निवडणूक लढवली होती.