सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
पाडळी येथील मंदिरातील दानपेटीवर डल्ला मारणाऱ्या चोरट्याने चार तासांतच आपल्या कृत्याची कबुली देताना देवाचे पाय धरले. पाडळी- निनाम (ता. सातारा) येथील वेताळमाळ परिसरात श्री वेताळेश्वर अन् श्री सिद्धिविनायकाची मंदिरे आहेत. गावातील भाविकांची नेहमीच या मंदिरांत गर्दी असते. काल रात्री तीन वाजण्याच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी श्री सिद्धिविनायक मंदिराची खिडकी फोडून आत प्रवेश केला.
मंदिरात असणारी दानपेटी फोडण्यात चोरटे यशस्वी ठरले. सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज त्यांनी पळविला. चोरी करून चोरटे जात असतानाच पहाटे उंब्रज पोलिसांच्या कचाट्यात ते सापडले. चोरट्यांच्या संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी पाडळी येथील मंदिरातील चोरीचा कबुलीजबाब दिला. सकाळी सहा वाजता पोलिसांनी मंदिरात आणताच चोरट्यांनी मूर्तीचे आहे.
पाय धरत चोरी केल्याचे नमूद केले. चोरलेला मुद्देमालही चोरट्यांनी पोलिसांना दाखवला. त्यामुळे या चोरीची, दैवी चमत्काराची प्रचिती आज दिवसभर पाडळी अन् परिसरात चर्चा सुरू होती. दरम्यान, श्री सिद्धिविनायक मंदिरात उद्या (बुधवारी) गणेश जयंतीचा सोहळा होणार आहे. त्यादृष्टीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सभामंडपाचे भूमिपूजनही होणार