Wednesday, February 8, 2023

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नव्हे तर टोळी, एक ना एक दिवस संपणारच; पडळकरांची टीका

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसून ती एक टोळी आहे, त्यांना कोणतीही वैचारिक बैठक नाही अशी जळजळीत टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. तसेच येत्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष संपणार आहे असा इशाराही त्यांनी दिला. पडळकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसला कोणताही वैचारिक बेस नाही. राष्ट्रवादीला कोणत्याही प्रकारचा राजकीय अजेंडा नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष एकच आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस ही संपणारी पार्टी आहे. हा पक्ष एक ना एक दिवस संपणार आहे. कोणत्या ना कोणत्या पक्षात ते विलीन होणार आहेत अशी टीका पडळकरांनी केली.

- Advertisement -

यावेळी त्यांनी भाजपचा अजेंडा सांगत पक्षाचं कौतुक केलं. भाजपमध्ये कोणतीही घराणेशाही शाही नाही. अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर नरेंद्र मोदी देशाचे नेतृत्त्व करतील असं कोणालाही माहित नव्हतं. तसेच भविष्यात भाजपचा अध्यक्ष कोण असेल हे सुद्धा माहित नसत. सबका साथ सब का विकास हाच आमचा अजेंडा आहे. राष्ट्र प्रथम हाच आमचा अजेंडा आहे असं पडळकरांनी म्हंटल