हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजकाल अनेकजण स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नोकरी तर करतातच मात्र त्यासोबत आर्थिक स्थिती वृद्धिंगत करण्यासाठी नोकरी सोबतच इतर जोडधंदा करण्याकडे अनेकजण वळतात. नोकरी सोबतच केला जाणारा जोडधंदा नेमका कोणता करायचा असा प्रश्न पडतोच. पण आता चिंता करू नका. आम्ही तुम्हाला अशाच काही साईड बिझनेस बद्दल काही आयडिया देणार आहोत त्यामाध्यमातून तुम्ही अगदी घरबसल्या पैसे कमवू शकता. आजकालच्या ऑनलाईन जगात घर बसल्या अनेक पर्याय वापरून आर्थिक स्थिती सुधारली जाऊ शकते. त्यामध्ये तुम्ही ऑनलाईन फोटो विकून पैसे कमाऊ शकता. तसेच व्हिडीओ बनवून पैसे कमवता येतात. आता ते नेमके कसे ते जाणून घेऊ.
१) फोटो विकून करा कमाई
तुम्ही घरबसल्या स्टॉक फोटोग्राफी वेबसाइट्समध्ये तुम्ही काढलेले फोटो अपलोड करून पैसे कमवू शकतात. कारण फोटोची आवड असलेले अनेक लोक उत्तम फोटो निवडून ते विकत घेतात आणि त्याद्वारे तुम्हाला पैसे कमावता येतात. तुम्हाला जर फोटोग्राफीची आवड असेल तर तुमच्यासाठी हा पर्याय उत्तम आहे. या वेबसाईटवर अपलोड केलेले फोटो मासिक संपादक, डिजायनर यासारख्यानशीही जोडले जाऊ शकतात. ज्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो.
२) व्हिडिओ बनवून कमवा पैसे
आजकालचे युग हे डिजिटल माध्यमाचे युग असल्यामुळे इंस्टाग्राम, फेसबुक यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विलॉग बनवून पैसे कमवले जातात. तसेच विलॉग बनवून लाखो रुपयांची कमाई करण्याचे सर्वाधिक ओळखला जाणारा प्लॅटफॉर्म म्हणजे youtube होय. याद्वारे तुम्ही विविध कन्टेन्ट नुसार लोकांचे मनोरंजन करून, माहिती देवून लाखो रुपयांची कमाई करू शकता.
३) ऑनलाईन ब्लॉग लिहून
अनेकजणांना लिहिण्याची आवडत असते. ही तुमची आवड तुम्हाला हजारो रुपयाची कमाई करून देऊ शकते. ब्लॉगर सारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्ही डोमेन खरेदी करून स्वतःची वेबसाईट तयार करून तुम्हाला आवडत असलेल्या विषयावर तुम्ही लिहू शकता. एवढंच नव्हे तर तुमची दैनंदिनी लिहून देखील तुम्ही पैसे कमावू शकता.