Side Effect Of COld Drinks | नुकताच उन्हाळा चालू झालेला आहे. या उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला कायम हाइड्रेट ठेवणे खूप गरजेचे असते. उन्हाळ्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. ही समस्या अगदी प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना होते. तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली तर त्याचा घातक परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळे अशावेळी जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला आपल्याला डॉक्टर देत असतात.
उन्हाळ्यात आपण जास्तीत जास्त लोकांचा थंड पेय पिण्याकडे जास्त भर देतो. लिंबू पाणी ,उसाचा रस या गोष्टी अगदी नैसर्गिक आहेत. त्यामुळे त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होत नाही. परंतु बरेच लोक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोल्ड्रिंक्स पितात. या कोल्ड्रिंक्समुळे आपल्या शरीराला तात्पुरती एनर्जी जरी मिळत असली तरी त्यामुळे आपल्या शरीराला अनेक घातक परिणाम भोगावे लागतात. मुख्यतः हे कोल्ड्रिंक जर तुम्ही रोज पीत असेल तर तुम्हाला डायबेटीसचा तसेच वजन वाढण्याचा त्रास प्रामुख्याने जाणवतो. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की जर तुम्ही रोज साखरेचे वैयक्तिक असाल तर तुमचे वजन वाढते.
कोल्ड्रिंक्स पिल्याने कोणत्या आजारांचा धोका वाढतो | Side Effect Of COld Drinks
कोल्ड्रिंक्समध्ये रसायनांचा जास्त वापर केला जातो. यामुळे यकृताचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. (Side Effect Of COld Drinks ) यासोबतच मधुमेह होण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणात वाढते आणि हृदयविकारासाठी देखील येऊ शकतो. या ड्रिंक्समधील सोडा त्याचप्रमाणे साखरेचे प्रमाण इतर घटक आपल्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक असतात. त्यामुळे जर तुम्ही रोज कोल्ड्रिंक रोज पित असाल तर तुमचे वजन वाढण्याची देखील शक्यता आहे.
त्याचप्रमाणे 250 ते 300 ml मध्ये 150 ते 200 कॅलरीज असतात. त्यामुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वर्तवली जाते. त्याचप्रमाणे त्यातील फॉस्फोरिक ऍसिडमुळे तुमची पचनक्रिया मंदावते आणि अन्न बसण्यासाठी तुम्हाला जड जाते.
बर्फाच्या गोळ्यामुळे देखील होते नुकसान
त्याचप्रमाणे उन्हाळ्यात बर्फाचा गोळा देखील मोठ्या प्रमाणात खातात. हा बर्फाचा गोळा दूषित पाण्यापासून तयार केलेला असतो. त्यामुळे त्यातील विषाणूमुळे पोटदुखी, जुलाब, टाइफाइड नीमोनियांसारखे आजार होतात. त्याचप्रमाणे बर्फामध्ये असलेल्या रंगामुळे पोटॅशचे विकार होतात. आणि त्वचेचा देखील विकार होतात. म्हणून उन्हाळ्यात रासायनिक गोष्टी पिण्यापेक्षा घरगुती गोष्टी खाऊन आणि पिऊन आपल्या शरीर हायड्रेटेड ठेवण्याचा प्रयत्न करा.