हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Side Effects of Coffee) अनेक लोकांना सकाळी उठल्या उठल्या अगदी बेडवरच चहा किंवा कॉफी लागते म्हणजे लागतेच. अशा लोकांचं म्हणणं असतं की, उठल्या उठल्या गरमागरम चहा – कॉफी प्यायल्याने एक तर झोप उडते आणि दुसरं म्हणजे अख्खा दिवस फ्रेश जातो. गेल्या काही काळात चहाप्रेमींइतकीच कॉफी प्रेमींच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक लोक सकाळी गडबडीच्या वेळेत घरातून बाहेर पडताना एखादवेळी खायला विसरतील पण कॉफी प्यायला विसरणार नाहीत.
काही लोक तर घरातून निघताना ही कॉफी पितात, ऑफिसमध्ये पोहोचल्यावर ही कॉफी पितात आणि त्यांना जेवणाच्या वेळी, स्नॅक टाइमिंगमध्येसुद्धा कॉफी पिण्याची सवय असते. अनेक लोकांचा असा समज आहे की, कॉफी मिल्कमेड असते आणि त्यामुळे ती चहापेक्षा आरोग्यासाठी चांगली असते. (Side Effects of Coffee) मात्र, ही कॉफी रिकाम्या पोटी प्यायल्याने आरोग्याचे मोठे नुकसान होते. याविषयी फार कमी लोक जाणतात. जर तुम्हीसुद्धा कॉफी लव्हर असाल तर ही बातमी जरूर वाचा. कारण, आज आम्ही तुम्हाला रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने आरोग्यावर कोणकोणते गंभीर परिणाम होऊ शकतात? याविषयी माहिती देणार आहोत.
रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने होतात ‘हे’ गंभीर आजार (Side Effects of Coffee)
1. शुगर वाढते – सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी जे लोक कॉफीचे सेवन करतात त्यांच्या इन्सुलिनची पातळी वाढण्याची शक्यता असते. तसेच ज्यांना मधुमेह असेल त्यांनी रिकाम्यापोटी कॉफी पिणे टाळायलाच हवे. कारण यामुळे त्यांच्या शरीरातील साखरेची पातळी वाढून आरोग्य संबंधित त्रास वाढण्याची शक्यता असते.
2. कोर्टिसोलची पातळी घटते – सकाळी रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने तरतरीतपणा येतो, असे म्हणणाऱ्या प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की जेव्हा सकाळी आपण उठतो तेव्हा आपल्या शरीरात कोर्टिसोल नावाचा हार्मोन तयार होतो. या हार्मोनमुळे आपल्याला दिवसभर फ्रेश राहण्यासाठी मदत होते. (Side Effects of Coffee) मात्र, रिकाम्या पोटी सकाळी कॉफी प्यायली तर हार्मोनल परिणामांमुळे अंगात आळशीपणा भिनतो. परिणामी अख्खा दिवस कंटाळवणा जातो.
3. ऍसिडिटी – रिकामी पोटी कॉफी प्यायल्याने शरीरात ऍसिड तयार होत. ज्यामुळे अपचन, छातीत जळजळ अशा तक्रारी उद्भवतात. (Side Effects of Coffee) जर तुम्ही नियमित सकाळी रिकामी पोटी कॉफी पीत असाल तर तुम्हाला पचनाशी संबंधित विविध समस्यांनादेखील सामोरे जावे लागेल.
4. पोटाचे विकार – रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने हार्मोनल संतुलन बिघडते. परिणामी न्यूरोट्रान्समीटरला उत्तेजना मिळते. यामुळे पोटाचे विविध विकार होण्याची शक्यता असते. आतड्या दुखणे, ऍसिडिटी होणे, पचनाचे विकार, पोटात अल्सर यांशिवाय हृदयाशी संबंधित समस्यादेखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
5. अति कॅफिन धोकादायक – जे लोक सकाळी रिकामी पोटी कॉफी पितात त्यांच्या शरीरात कॅफिनची मात्रा अचानक वाढते. परिणामी फाईट आणि फ्लाईट रिप्लाय उत्तेजित होतो. यामुळे आपल्याला भीती वाटते किंवा पॅनिक अटॅक देखील येऊ शकतात. (Side Effects of Coffee)