हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Side Effects Of Eating Bitter Gourd) उत्तम आणि सुदृढ आरोग्यासाठी आपल्या आहारात विविध भाज्यांचा समावेश असणे गरजचे असते. यामध्ये बऱ्याचदा न आवडणाऱ्या भाज्यांचा सुद्धा आवर्जून समावेश करावा लागतो. यामध्ये कडू कारल्याचं नाव पहिलं समोर येतं. बऱ्याच लोकांना कारलं खायला आवडत नाही. पण कारल्याचे सेवन केल्यास मिळणारे फायदे इतके आश्चर्यकारक आहेत की, ते टाळून उपयोग नाही. त्यामुळे बरेच लोक आवडत नसलं तरीही फायदेशीर आहे म्हणून कारलं खातात.
तर काही लोक कारल्याच्या प्रभावी गुणांना भाळून त्याचे अति सेवन करतात. खास करून मधुमेही. ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे असे लोक वारंवार कारल्याचा कडू रस पिताना दिसतात. निश्चितच कारल्याचा रस पिणे फायदेशीर आहे. (Side Effects Of Eating Bitter Gourd) पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. त्यामुळे जर तुम्हीही कारल्याचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन करत असाल तर सावधान!! तुमच्या आरोग्याचे नुकसान होऊ शकते. चला या विषयी अधिक माहिती घेऊया.
मधुमेहींसाठी कारलं म्हणजे वरदान
कारल्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आणि तत्वे समाविष्ट असतात. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. खास करून मधुमेहाचा त्रास असणाऱ्या लोकांना याचा सर्वाधिक लाभ होतो. (Side Effects Of Eating Bitter Gourd) रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी कारले बरेच प्रभावी ठरते, असे काही संशोधनातून समोर आले आहे. म्हणून कारल्याचे अतिसेवन करणे हा काही उपाय असू शकत नाही.
हायपोग्लायसीमियाचा धोका वाढू शकतो
मधुमेहींनो सतत कारलं खाल्ल्यामळे किंवा त्याचा रस प्यायल्याने फायदा कमी आणि तोटा जास्त होईल हे लक्षात घ्या. एखाद्या व्यक्तीचा मधुमेह नियंत्रणात असेल किंवा डायबिटीजची लेव्हल कमी असेल तरीही तो जर कारल्याचे सेवन करत असेल तर डायबेटिजची लेव्हल कमी होऊन हायपोग्लायसीमियाची स्थिती निर्माण होऊ शकते. (Side Effects Of Eating Bitter Gourd) जे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. कारल्यात असे गुणधर्म असतात जे शरीरातील इन्सुलीनची लेव्हल कमी करतात. ज्यामुळे शरीरातील ब्लड शुगर लेव्हल कमी होते. त्यामुळे कारले प्रीडायबेटिक किंवा मधुमेहावर उपचार नसून ते केवळ रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते, हे समजून घ्या.
इतर धोके (Side Effects Of Eating Bitter Gourd)
गरोदर स्त्रियांनी कारल्याचे अधिक सेवन कधीच करू नये. असे केल्यास त्याचा गर्भावर परिणाम होऊ शकतो. शिवाय कारले रोज खाणाऱ्यांच्या यकृताचे आरोग्य बिघडू शकते. तसेच, कारल्यात लेक्टिन असते. ज्याच्या अति सेवनाने जुलाब आणि उलट्या होऊ शकतात. त्यामुळे आरोग्यदायी फायद्यांसाठी कारल्याचे सेवन प्रमाणात करावे.