इस्लामपूरचे ईश्वरपूर नामकरणासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू, स्वाक्षरी करण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । इस्लामपूर शहराच्या ईश्वरपूर या नामकरण मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी आज नागरिकांनी स्वाक्षरी मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. भगवानराव साळुंखे यांच्या हस्ते स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. ईश्वरपूर या नामकरणासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख व नगरसेवक आनंदराव पवार यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. शहरातील नागरिकांची खुप वर्षांपासून मागणी आहे. स्व.बाळासाहेबांनी 1986 साली यल्लाम्मा चौक येथील जाहीर सभेत या शहराला ईश्वरपूर असे नामकरण केले होते.

शिवसेनेच्या वतीने लोकनियुक्त नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना शहराचे प्रथम नागरीक म्हणून निवेदन दिले आहे. बुधवारी शहरातील यल्लाम्मा चौक येथे नामकरणाला पाठींबा देण्यासाठी सह्या करण्यासाठी गर्दी झाली होती. शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळे, नवरात्रोत्सव मंडळे, मंदिरांच्या समित्या, सामाजिक संघटना, सर्व समाजाच्या प्रतिनिधी तसेच शहरात कार्यरत असणारे सोशल मिडीया, प्रसार माध्यम ग्रुप तसेच शहरातील नागरिक, युवा मित्र, भगिनी यांनी यामध्ये सहभागी होवून स्वाक्षरी केली. सेल्फी पाईन्ट उभा करण्यात आला होता. मी स्वाक्षरी केली तुम्ही करा असा मजकूर फलकावर होता.

यावेळी तालुकाप्रमुख सागर मलगुंडे, नगरसेवक प्रदीप लोहार, शकील सय्यद, प्रतिभा शिंदे, सीमा पवार, राजेंद्र पवार, उमेश पवार, राहूल टिबे, राजेश मंत्री, सतिश पाटील, अंकुश माने, दिपक माने, आशपाक जमादार, राजू पठाण, नजीर मुल्ला, जयवंत खंडागळे, तानाजी घोरपडे, सतिश महाडिक यांच्यासह परिसरातील नागरीक आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Leave a Comment