कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड शहर शिवसेना व युवासेना याच्याकडून वेदांता- फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजरातला गेल्याने शिंदे- फडणवीस यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. यासाठी कराड बसस्थानकासमोरील चाैकात स्वाक्षरी मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत विद्यार्थी, नागरिक यांनीही सहभागी होत स्वाक्षरी करत राज्य सरकारचा निषेध केला.
कराड येथे स्वाक्षरी मोहिम शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन काशीद, दिलीप यादव, संजय चव्हाण, महिला जिल्हा संघटिका श्रीमती अनिताताई जाधव, महिला तालुका संघटिका सौ.शोभाताई लोहार, प्रेमलताताई माने, संदीप पाटील, युवासेना शहर अधिकारी अक्षय गवळी, ज्ञानदेव भोसले, दशरथ धोत्रे, संभाजीराव जगताप, बापूराव भिसे, प्रवीण लोहार, निलेश पारखे, रामचंद्र पवार, धवल जाधव यांनी राबविली.
यावेळी अक्षय गवळी म्हणाले, महाराष्ट्रात ठाकरे सरकार असताना वेदांता प्रकल्प येणार होता. यासंबधी कंपनीही तयार होती. परंतु केवळ दोन महिन्यात शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आले आणि राज्यातील मोठा प्रकल्प गुजरातला गेला. त्यामुळे आम्ही सध्याच्या शिंदे- भाजप सरकारचा युवासेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यासाठी स्वाक्षरी मोहिम राबविली आहे.