विशेष प्रतिनिधी । नातं कोणतही असो बहीण- भाऊ , आई – वडील आणि महत्वाची अशी दोन नाती ज्यांच्यामध्ये हमखास वादंग होतात . ते म्हणजे सासू – सून आणि पती – पत्नी … संवादाने नातं बहरतं हे जरी खरं असलं , तरी संवाद केव्हा साधायचा हे देखील महत्वाचे असते . व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात . पण काही नात्यांना आधी समजून घेऊन मग संवाद केल्यास नातं अधिक बहरेल .
रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी जसे उपाय सांगितले जातात , कि मनात १० अंक मोजा, तोच हा उपाय आहे . सासू बोलली म्हणून नव-याकडे तक्रार आणि नवरा बोलला म्हणून माहेरी तक्रार असे अनेक ठिकाणी एव्हाना सगळी कडेच घडत असते . पण त्यातून केवळ घडते एव्हडेच कि , ज्या गोष्टी चार भिंतीत सोडवल्या जायला हव्या , त्या गावभर चर्चेचा विषय ठरतात . त्यासाठी मौन हे कौशल्य शिका ….
जेव्हा लहान मोठी कुरबुर होते तेव्हा सडेतोड उत्तर देऊ नका . मौन धारण करा . काही वेळ जाऊ द्या … त्यानंतर शांतपणे तुमची बाजू नक्की मांडा . तुम्ही जितक्या शांतपणे स्वतःची बाजू पटवून द्याल , तितके नात्यांमध्ये यशस्वी व्हाल . शब्दांनी शब्द वाढवण्यापेक्षा शांत राहणं हे सुरुवातीला नक्की थोडे कठीण जाईल , पण हे मौन कौशल्य तुमची एक प्रगल्भ प्रतिमा निर्माण करू शकेल .