हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Sinauli Village) जमिनीच्या पोटात अनेक रहस्य दडलेली असतात. यातील काही भयंकर तर काही अनेक प्रश्न निर्माण करणारी असतात. असच एक भयावह आणि थक्क करणारं सत्य उत्तर प्रदेशात अनेकांनी डोळ्यांनी पाहिलंय. यूपीतील एका गावात जमिनीतून विचित्र आवाज येत असल्याचे अनेक स्थायिकांनी सांगितले. सतत जमिनीच्या आतून कुणीतरी ठोठवतंय असा भास व्हायचा आणि म्हणून गावकऱ्यांनी मिळून त्या जागी खोदकाम केले. हे खोदकाम केले असता त्यांच्यासमोर जे चित्र होतं ते अक्षरशः हादरवणारं होत. चला तर जाणून घेऊयात या ठोठावणाऱ्या जमिनीचं रहस्य.
ठोठावणाऱ्या जमिनीचं रहस्य
उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये शेतकरी प्रभा शर्मा हे आपल्या शेतात शेती करत असताना त्यांना जमिनीतून विचित्र हालचाली जाणवल्या. यावेळी जमिनीतून कोणीतरी ठोठावत असल्याचा त्यांना भास झाला. (Sinauli Village) याबाबत त्यांनी गावातील इतर लोकांशी चर्चा केली असता सर्वानी मिळून या ठिकाणी खोदकाम केले. खोदकाम सुरु असताना या लोकांवर अत्यंत विचित्र दृश्य आले. या ठोठावणाऱ्या जमिनीत तब्बल १०६ मानवी सांगाडे दिसून आले. हा प्रकार पाहून सगळेच हादरले.
गावकऱ्यांनी तत्काळ प्रशासनाकडे धाव घेतली आणि प्रशासनाने पुरातत्व खात्याला कळविले. यानंतर पुरातत्व खात्याकडून या जागेचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यांनी आणखी खोदकाम केले आणि या जमिनीच्या पोटात त्यांना आणखी काही वस्तू सापडल्या.
कुठे घडली ही घटना? (Sinauli Village)
यमुना नदीपासून ८ किलोमीटर अंतरावर सिनौली नावाचे एक गाव आहे. या गावातच ही घटना घडल्याचे समोर आले आहे. हे गाव सुमारे ४ हजार बिघामध्ये पसरले असून या गावातील लोकसंख्या सुमारे ११ हजार इतकी आहे. यामध्ये जाट वर्गाची संख्या मोठी आहे तर ब्राह्मण दुसऱ्या क्रमांकावर आहेत. याशिवाय दलित आणि मुस्लिम वर्गातील देखील अनेक कुटुंब या गावात आहेत.
३००० वर्षाहून जुने सांगाडे
एका वृत्तानुसार, घडलेल्या प्रकाराबाबत शेतकरी प्रभा यांनी महत्वाची माहिती दिली आहे. या माहितीच्या आधारे भारतीय पुरातत्व खात्याच्या टीमने त्यांच्या शेतात उत्खनन सुरु केले. (Sinauli Village) पुरातत्व खात्याने दिलेल्या माहितीनुसार, या जमिनीत सापडलेल्या १०६ मानवी सांगाड्यांची कार्बन डेटिंग केली असता हे सांगाडे ३ हजार वर्षाहून अधिक जुने असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच उत्खनन करतेवेळी अन्य अनेक अद्भुत गोष्टी सापडल्याचे देखील सांगितले आहे.
उत्खननात सापडल्या अद्भुत गोष्टी
या ठोठावणाऱ्या जमिनीत उत्खनन केले असता सुरुवातील शेतामध्ये एक दोन नव्हे तर तब्बल ८ कबरी सापडल्या. ज्यामध्ये हे मानवी सांगाडे होते. इतकेच नव्हे तर या सांगाड्याखाली शस्त्रे, चैनीच्या वस्तू, भांडी, प्राणी, पक्षी यांचेदेखील अवशेष सापडले आहेत. पुढे आणखी खोदकाम केले असता मृतदेहांसोबत पुरलेले तीन रथसुद्धा सापडले. (Sinauli Village) या सर्व वस्तू साधारण ४ हजार वर्षांहून अधिक जुन्या भारताच्या विकसित संस्कृतीचे प्रतिबिंब असल्याचे पुरातत्व खात्याने रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. इतकेच काय तर या जमिनीतून सुमारे ४ हजार वर्षे जुनी अँटेना तलवार आणि तांब्याचे चिलखतही सापडले आहे.
आव्हानात्मक अवशेष
या जमिनीतून सापडलेले ४ हजार वर्ष जुने रथ, अँटेना तलवार, शवपेटी या गोष्टी अद्भुत आहेत. सिनौलीची संस्कृती नंतरच्या वैदिक कालखंडातील आणि हडप्पा संस्कृतीमधील संस्कृतीशी संबंधित असल्याचे यातून दर्शन घडत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. तसेच या जमिनीत सापडलेल्या वस्तूंचे अवशेष हे ब्रिटिशांनी लिहिलेला इतिहास बदलण्यासाठी पुरेसा असल्याचेदेखील त्यांनी म्हटले. शिवाय स्थानिक लोक याचा संबंध महाभारत काळाशी असल्याचे सांगत आहेत. (Sinauli Village)