देशात कोरोना मृतकांचा आकडा ६६ हजारांच्या पार; मागील २४ तासात १ हजार ५४ जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । मागील काही दिवसांपासून देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याची स्थिती आहे. दररोज ७५ हजारांपेक्षा जास्तीच्या सरसरीनं बाधित रुग्ण आढळून येत असून, मंगळवारी या आकड्यात दिलासादायक घट झाली होती. मात्र पुन्हा मागील २४ तासात रुग्णसंख्येचा आलेख वरच्या दिशेकडे वळला आहे. चिंताजनक बाब म्हणजे देशात मृतांची संख्येमध्येही मोठी वाढ झाली आहे. देशात कोरोना मृतकांचा आकडा ६६ हजारांच्या पार पोहोचला आहे.. तर मागील २४ तासात एक हजारांपेक्षा जास्त जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत कोरोनामुळे ६६ हजार ३३३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मागील २४ तासांत देशात १ हजार ५४ जणांचा कोरोना संसर्गानं मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना रुग्णसंख्येत बुधवारी मोठी वाढ झाली. गेल्या २४ तासांत देशात ७८,३५७ जण करोना बाधित आढळून आले. दरम्यान, देशातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ३७ लाख ६९ हजार ५२४ इतकी झाली आहे. यात ८ लाख १ हजार २८२ रुग्ण सध्या देशभरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर २९ लाख १ हजार ९०९ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत.

मंगळवारी मागील २४ तासातील आकडेवारी जाहीर करण्यात आली होती. ही आकडेवारी दिलासा देणारी होती. नव्यानं आढळून आलेल्या रुग्णसंख्येत आणि मृतांच्या आकड्यात मोठी घट झाल्याचं बघायला मिळालं होतं. ६९ हजार ९२१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. तर ८१९ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, त्यानंतर २४ तासातच नवीन रुग्णसंख्येच्या आकड्यानं उसळी मारली आहे. मंगळवारच्या तुलनेत जवळपास साडे ८ हजार जास्तीच्या रुग्णांची वाढ झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.