हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारतीय ऑटोबाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ सुरु आहे. पेट्रोल – डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे अनेक ग्राहक इलेक्ट्रिक वाहनाकडे आपली पसंती दाखवत आहेत. मात्र इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीही काही कमी नाहीत, त्यामुळेच अनेकांची इच्छा असूनही काहीजण ते खरेदी करू शकत नाहीत. मात्र देशात असेही काही तरुण आहे जे आपली डोक्यालिटी वापरून गाडी बनवू शकतात. होय, आज आम्ही तुम्हाला अशाच एका तरुणाबद्दल सांगणार आहे, ज्याने देसी जुगाड करून चक्क एका चाकाची इलेक्ट्रिक स्कूटर (Electric Scooter) तयार केली आहे.
क्रिएटिव्ह सायन्स या युट्युब चॅनेलवर हा एका चाकाच्या इलेक्ट्रिक स्कूटरचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये आपण बघू शकता की, ही स्कूटर बनवण्यासाठी जाड आणि रुंद चाक घेण्यात आले असून ते एका मोठ्या धातूच्या सीटमध्ये बसवण्यात आले आहे. त्याच्या आजूबाजूला स्टीलच्या सीट शीटचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये इलेक्ट्रिक मोटरचा वापर करण्यात आला असून त्यात बॅटरीही बसवण्यात आली आहे. खरं तर एका चाकावर ही स्कुटर बॅलेन्स कशी धरू शकते हा प्रश्न पडत आहे. त्यामुळे देशभरातील वाहन उत्पादक कंपन्या सुद्धा नक्कीच हैराण होतील.
या स्कूटरमध्ये एक सेन्सर बसवण्यात आला आहे, ज्याच्या मदतीने ही स्कूटर बॅलन्समध्ये राहते. स्कुटरचा वेग वाढवण्यासाठी यामधील इलेक्ट्रिक मोटरला थ्रॉटल बसवण्यात आले आहे. सोशल मीडियावर या एका चाकावर धावणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून तुम्हीही नक्कीच तोंडात बोटे घालाल.