पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये चोरींच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील मंदिरात एका चोरट्याने मंदिरातील दानपेटी फोडून रोख रकमेची चोरी केली आहे. या चोरट्याने दानपेटीत रक्कम आणि इतर ऐवज लंपास केला आहे. आज पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या चोरट्याने कटावणीने मंदिराच्या गाभाऱ्याचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. यानंतर त्याने गाभाऱ्यात प्रवेश करत दानपेटीतून रोख रक्कम चोरी केली. यामध्ये विशेष बाब म्हणजे या मंदिरातील दानपेटी फोडून चोरी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यगोदरसुद्धा तीन वेळा या मंदिरात चोरी झाली होती. यामुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. चोरीची हि घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
पुण्यातील सिंहगड रोडवरील मंदिरात चौथ्यांदा चोरी, दानपेटी फोडून रोखरक्कम केली लंपास pic.twitter.com/Wmf5T4REaY
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) April 12, 2022
काय आहे नेमके प्रकरण ?
पुणे शहरातील सिंहगड रोडवरील किरकटवाडी येथील मंदिरामध्ये एका चोरट्याने मंदिरातील दानपेटी फोडून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि इतर ऐवज लंपास केला आहे.
नेमकं काय घडलं?
पहाटे साडेचार वाजता हि चोरीची घटना घडली आहे. या चोरट्याने मंदिराच्या गाभाऱ्याचे कुलूप आधी कटावणीने तोडले. त्यानंतर गाभाऱ्यात प्रवेश करत दानपेटीतून रोख रक्कम चोरी केली. हि चोरीची घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. या मंदिरात एकदा, दोनदा नाहीतर चौथ्यांदा हि चोरी झाली आहे. या प्रकरणी पोलीस योग्य कारवाई करत नसल्याचा दावा करत ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे.