SIP Investment | आजकाल महागाईच्यादृष्टीने विचार केला तर भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे. अनेक लोक आजकाल विविध योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. यामध्ये fd, आरडी, SIP यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. जर तुम्ही देखील SIP मध्ये म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये (SIP Investment) गुंतवणूक करत असाल, तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे.
आजकाल अनेक लोक म्युच्युअल फंडसच्या माध्यमातून SIP मध्ये गुंतवणूक करतात. अनेक लोकांना यातून खूप चांगला परतावा मिळतो, तर अनेकांना पैसे मिळत नाही. परंतु जास्त परतावा न करणाऱ्या गोष्टींना तुमच्या छोट्या छोट्या चुका कारणीभूत ठरतात. त्यामुळे SIP मध्ये गुंतवणूक करताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे असते. आणि त्या गोष्टीनुसार प्लॅनिंग करून तुम्हाला गुंतवणूक करायची असते. तुम्ही SIP मध्ये गुंतवणूक करत असाल, तर या चार गोष्टी तुम्ही नक्की लक्षात ठेवा. ज्यामुळे तुम्हाला खूप चांगला परतावा मिळेल. तर याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
रिसर्च करणे
SIP सुरू करण्याआधी तुम्हाला रिसर्च करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे कोणतीही SIP घेण्याआधी त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या. किंवा तुमच्या सल्लागाराची मदत घ्या. त्यामुळे तुमचे होणारे नुकसान देखील कमी होईल आणि तुम्हाला रिटर्न्स देखील चांगले मिळतील. तसेच कोणत्या SIP मध्ये गुंतवणूक करावी हे देखील कळेल.
छोट्या रकमेने सुरुवात करा | SIP Investment
तुम्ही अगदी कमीत कमी रकमेने देखील SIP सुरू करू शकता. अनेक लोकांना असे वाटते की, जास्त गुंतवणूक करूनच SIP मध्ये गुंतवणूक करता येते. परंतु जर तुम्ही मोठी गुंतवणूक केली, तर तुमचे नुकसान देखील मोठे होऊ शकते. अचानक आर्थिक समस्या आली तर मोठी रक्कम काढल्याने तुमच्या रिटर्न्सवर देखील त्याचा परिणाम होतो. त्यामुळे छोट्या छोट्या रकमेच्या दोन-तीन SIP सुरू करू शकता.
SIP अचानक बंद करू नका
SIP ही लॉंग टर्मसाठी उत्कृष्ट आहे. जितका जास्त वेळ तुम्ही गुंतवणूक कराल. तितके तुम्हाला चांगला परतावा मिळेल. तुम्ही जर SIP मध्येच बंद केली, तर तुम्हाला त्याच्या रिटर्न्सचा फायदा घेता येणार नाही. त्यामुळे बाजारात मंदी आली किंवा बाजार पडल्यावर तुम्ही गुंतवणूक काढून घेता. परंतु असे करू नका असे केल्याने तुमचे नुकसान होते.
गुंतवणुकीचे टार्गेट ठरवा
SIP मध्ये गुंतवणूक करणे आधी तुम्हाला रक्कम गुंतवणुकीचे टार्गेट ठरवायला हवे. तुमच्या मुलाचे शिक्षण, लग्न आणि रिटायरमेंटसाठी तुम्ही हे SIP प्लॅनिंग करू शकता. या कामासाठी तुम्हाला किती पैसा लागणार आहे हे ठरवा आणि त्यानंतरच अंदाजानुसार गुंतवणूक करा.