Breaking | पुण्यात २४ तासात कोरोनानाने घेतला ८ जणांचा बळी

0
32
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । राज्यात दिवसेंदिवस कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या दरात वाढ होत आहे. मृतांच्या संख्येत होणारी ही वाढ चिंताजनक आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासात पुण्यात ८ जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसोबत आता पुण्यात मृतांचा आकडा १६वर पोहोचला आहे.

तर दुसरीकडे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता १ हजार १३५ इतकी झाली आहे. तर, आज तब्बल एकाच दिवसात 117 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात १२० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आले असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी जर बाहेर पडावं लागत असेल किंवा कोणत्याही कारणासाठी बाहेर पडायचं असेल तर मास्क वापरणं सक्तीचं आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. सोशल डिस्टन्सिंग सगळ्यांनी काटेकोरपणे पाळावं असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. अगदी कॉटनचा मास्क वापरलात तरीही चालेल मात्र वापरणं सक्तीचं आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here