औरंगाबाद | संपूर्ण राज्यभर कोरोना महामारीने थैमान घातलेले आहे, आता म्यूकरमायकोसिस या आजाराने सुद्धा थैमान घातलेले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात म्यूकरमायकोसिस रोगाचा संसर्ग अधिक आहे. या मुक्रमायकोसिसचे बऱ्याच प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. आणि या आजारामुळे भरपूर रुग्णांच्या मृत्युचे प्रमाण वाढत आहे. म्यूकरमायकोसिसमुळे शहरात मृत्यूचे आकडे वाढतच आहेत.
रविवारी दिनांक 15 जून रोजी म्यूकरमायकोसिसचे 4 तर सोमवारी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसात या आजाराने मृत्यू झालेल्यांचा आकडा हा 114 वर गेला होता. यातच दोन दिवसात 19 नवीन रुग्ण दाखल झाले आहेत. आतापर्यंत 982 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे. त्यापैकी 287 रुग्ण ऍक्टिव्ह असून त्यापैकी 581 रुग्णांची उपचारानंतर सुट्टी करण्यात आला आहे. त्याचबरोबर घाटी मध्ये सध्या जास्तीत जास्त 100 रुग्णावर उपचार सुरु आहे. त्यातच एमजीएम रुग्णालयात 69, हेडगेवार रुग्णालयात 39,एमआयटी 19, युनायटेड सिग्मा रुग्णालयात 18 असे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली असून म्यूकरमायकोसिस आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. कोरोना बाधित आणि इतरांना हा आजार होत असून शहर आणि जिल्ह्यासोबत मराठवाड्यातील रुग्ण इतर ठिकाणाहून उपचारासाठी शहरात येत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे.