डोळ्यांदेखत 6 जण पुराच्या पाण्यात वाहून गेले, बार्शीमधील धक्कादायक घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बार्शी : हॅलो महाराष्ट्र – सध्या पावसाने सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. तर काही नद्या तुंबून वाहत आहेत. काही नद्यांना पूरजन्य परिस्थिती (flood water) पाहायला मिळत आहे. सध्या सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होत असतात कधी पुराच्या पाण्यात (flood water) वाहने वाहून जातात तर कधी जनावरे तर कधी माणसं देखील या पुराच्या पाण्यामध्ये वाहून (flood water) गेल्याचे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील. अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ बार्शी तालुक्यातून समोर आला आहे. या पुराच्या पाण्यात तब्बल सहा जण वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र सुदैवाने गावकऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे या सहाही जणांना वाचवण्यात यश आले आहे.

ही संपूर्ण घटना किनाऱ्यावर उभ्या असलेल्या गावकऱ्यांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केली आहे. ही घटना बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी गावामध्ये घडली आहे. व्हिडिओत आपण पाहू शकतो ओढ्याला पूर (flood water) आला आहे आणि त्याच पाण्यातून ही सहा लोक वाट काढत सावधपणे पुढे चालताना दिसत आहेत. मात्र अचानक पणे या सहा जणांपैकी एकाचा तोल गेला आणि तो खाली पडला. त्याच पाठोपाठ सगळ्यांचे तोल गेल्याने सगळेजण पाण्यात वाहून गेले. मात्र तेथे उभे असलेल्या गावकऱ्यांच्या अथक प्रयत्नाने या सहा जणांना वाचवण्यात त्यांना यश आले आहे.

पप्पू शिरसागर, पप्पू कुंभार, दिलीप ताकभाते, अनिता ताकभाते पोपट घाडगे, अनुसया घाडगे आणि निखील कुंभार अशी या सहा जणांची नावे आहेत. हा व्हिडिओ पाहून नक्की असेच म्हणावे लागेल” काळ आला होता पण वेळ आली नव्हती”. सध्या या सहा जणांना वाचवण्यात यश आल्याने गावकऱ्यांमध्ये एक समाधानाची भावना दिसत आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!