हिंगोलीमध्ये ट्रक आणि जीपच्या अपघातात सहाजणांचा जागीच मृत्यू

Hingoli Road Accident
Hingoli Road Accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हिंगोली | सतिश शिंदे

कलगाव पाटी गावाजवळ रात्री २ वाजेताच्या सुमारास ट्रक आणि जीपचा भीषण अपघात झाला. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना हिंगोली जिल्हा रुग्णालयातून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आलेले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील कलगाव पाटी गावाजवळ रात्री २ च्या सुमारास भरधाव ट्रकने (एचआर ६९ ए ६८५५) जीप (एमएच ३७ व्ही २४४४) जोराची धडक दिली. यामुळे भीषण अपघात होऊन सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की जीपचा पूर्णपणे चुराडा झालेला आहे. अपघातात मृत झालेले ६ जण वाशिममधील असल्याचे समजत आहे.

गणेश लक्ष्मण हजारे, नरसिंह सोपान हजरे, सतिश नारायण मुरकुटे, राजू विष्णू धामणे, अनिल गजानन चव्हाण आणि स्वप्नील राम इरतकर अशी मृतांची नावे आहेत. जखमींची नावे मदन जयाजी चव्हाण, सखाराम जिजीब जाधव (रा. सुरकुंडी, ता. जिल्हा वाशिम), अशी अपघातातील मृत्यू झालेल्या लोकांची नावे आहेत.