मराठा आरक्षणासाठी आणखी एका तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

man suicide for maratha aarakshan

हिंगोली प्रतिनिधी : रमाकांत पोले सध्या संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation)  मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळालेच पाहिजे अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत आहे. त्यातच आता हिंगोली जिल्हयातील शेवाळा शिवारात एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना गुरुवार दि.२६ ऑक्टोंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. … Read more

Crime News : जावयाने केला सासूचा खून; कारण ऐकून बसेल धक्का

Hingoli Son-in-law killed mother-in-law

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जावयाने आपल्याच सासूचा खून केल्याची धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे घडली आहे. या खुनानंतर आरोपीने घरातून पळ काढला, परंतु पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत. लताबाई नागराव खिल्लारे (50) असे मृत सासूचे नाव असून आरोपीचे नाव अजय सोनावणे असे आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, अजय … Read more

‘मुख्यमंत्री महोदय, अडाणी पिढी तयार होण्यापूर्वी शाळा सुरू करा’; विद्यार्थ्यांचा पोलीस ठाण्यातच ठिय्या

औरंगाबाद – कोरोनाची भिती घालून फक्त शाळाच बंद केल्या आहेत. बियर बार सुरू, बाजार सुरू, मंदिरे सुरू, सिनेमा गॄह सुरू मग आमच्या शाळाच बंद का ? असा प्रश्न उपस्थित करत अडाणी पिढी तयार होण्यापूर्वीच शाळा सुरू करा आणि आमचे अडाणीपण घालवा अशी आग्रही मागणी विद्यार्थ्यांनी पोलिसांपुढे केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देता देता पोलिसांच्या नाकीनऊ … Read more

सोलापूरकडे जाणाऱ्या 60 कामगारांच्या बसला अपघात, 15 जण जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिंगोली-नांदेड राज्य महामार्गावर जामगव्हाण पाटीजवळ रायपूर (छत्तीसगड) येथून सोलापूरकडे जाणाऱ्या 60 कामगारांच्या बसचा अपघात झाला. या अपघातात 15 कामगार जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. जखमींना तत्काळ नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, रायपूर (छत्तीसगड) हून सुमारे 60 कामगार … Read more

हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; चार ठार तर 24 जखमी

accident

औरंगाबाद – हिंगोली ते नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर पार्डी मोडजवळ ट्रकला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनर व बसच्या विचित्र अपघातात चार जण ठार तर 24 जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी दोन वाजेच्या दरम्यान घडली. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती अत्यावस्थ असल्याने त्यांना हिंगोली व नांदेड येथे हलविण्यात आले आहे. याविषयी अधिक वृत्त असे की, एम एच 38 … Read more

हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा जमिनीतून गूढ आवाज; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

हिंगोली- वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे भूगर्भातून आवाज येण्याची मालिका सुरुच असुन परत आज रविवारी सकाळी ५.४७ वाजता एक व त्यानंतर लगेच दुसरा आवाज आला. या आवाजाने कोणतेही नुकसान झाले नाही. मात्र गावकरी भयभीत झाले आहेत. वसमत तालुक्यासह कळमनुरी व औंढा तालुक्यातील काही गावांत देखील आवाज आले आहेत. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे या गावात मागच्या … Read more

घराची भिंत कोसळून पती-पत्नी गंभीर जखमी

Wall collaps

हिंगोली : औंढा नागनाथ येथील रहीम चौक परिसरामध्ये राहत असलेल्या इसाखोद्दीन जाहिरोद्दीन खतीब यांच्या घरावर शनिवारी दुपारी तीन वाजता शेजारच्या घराची भिंत कोसळली. यात इसाखोद्दीन जहिरोद्दीन खतीब व त्यांची पत्नी आरेफाबी इसाखोद्दीन खतीब हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या तीन शेळ्यांवर भिंत कोसळून त्या जागीच ठार झाल्या त्यामुळे या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. त्यांच्या मुलीचे … Read more

तब्बल सव्वादोन कोटींचा वाळूसाठा जप्त परवानगी नंतर होणार लिलाव

वसमत : सव्वा दोन कोटींचा ब्रास वाळू साठा जप्त केल्याची घटना वसमत येथील तालुक्यात घडली आहे. तहसीलदार अरविंद बेळंगे आणि त्यांच्या पथकाने जप्त केला आहे. वसमत तालुक्यात पूर्णा नदी आणि नाल्यातून वाळू उपसा केला जातो. वाळू उपसा करून वाहतुकीची सर्व माहिती सादर करण्याच्या सूचना तहसीलदार यांनी दिल्या होत्या. परंतु वाळू उपसाचे कंत्राट घेणार्‍या कंत्राटदारांनी ही … Read more

अरे बापरे! हिंगोलीत एकाच दिवसात २५ SRPF जवान कोरोना पॉझिटिव्ह

हिंगोली । हिंगोली जिल्ह्यात एसआरपीएफच्या आणखी २५ जवानांना कोरोनाची लागण झाल्यानं येथील रुग्णांची संख्या ४६ वर पोहोचली आहे. हिंगोलीत आतापर्यंत ४७ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यापैकी ४१ हे एसआरपीएफचे जवान आहेत. याआधीही मुंबई, मालेगाव व जालन्याहून हिंगोलीत परतलेल्या एकूण १६ जवानांना करोना झाल्याचं उघड झालं होतं. त्यात आता २५ जवानांची भर पडली आहे. दरम्यान, … Read more

सततच्या नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

हिंगोली प्रतिनिधी ।  कळमनुरी तालुक्यातील चिखली येथील ३६ वर्षीय शेतक-याने सततच्या नापिकीला कंटाळून गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली. गणेश रामराव चव्हाण असं शेतकऱ्याचं नाव असून त्यांच्या आत्महत्येनंतर गावावर शोककळा पसरली. मयत चव्हाण अल्पभूधारक शेतकरी होते. मागील तीन वर्षापासून शेतात नापिकीच सुरू होती. त्यातच मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसानं शेतात लागवड केलेले सोयाबीन पिकाचे नुकसान … Read more