Thursday, March 30, 2023

राज्यसभेत तृणमूल काँग्रेसच्या सहा खासदारांचे निलंबन

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या दिल्ली येथे राज्यसभेचे अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करीत हल्लाबोल केला जात आहे. दरम्यान, आज राज्यसभेच्या अधिवेशनात काही खासदारांनी वेलमध्ये उतरुन घोषणा दिल्या तसेच गोंधळ निर्माण करण्याचा प्रकार घडला. यावरून राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी गोंधळ घालणाऱ्या खासदारांना तत्काळ निलंबित केले.

याबाबत अधिक माहिती अशी कि, आज सकाळी राज्यसभेचे अधिवेशन सुरू झाले. सभागृहात सर्वजण एकत्रित आले. त्यावेळी राज्यसभेच्या अधिवेशनाचे काम सुरु करणार तो सभागृहात तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी एकत्रित येत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेले अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी शांत राहण्याचे आवाहनही केले. मात्र, संबंधित खासदारांनी काहीही न ऐकल्याने अखेर राज्यसभेत गोंधळ निर्माण करणाऱ्या सहा खासदारांना निलंबित करण्यात आले.

- Advertisement -

राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी गोंधळ घाल्याप्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या दोला सेन, नदिमुल हक, अबीर रंजन बिस्वास, शांता छेत्री, अर्पिता घोष आणि मौसम नूर या खासदारांना निलंबित केले आहे. हे सर्व तृणमूल खासदार पेगॅसस वादावर गोंधळ निर्माण करत होते.