अमरावती प्रतिनिधी । अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे एका चिमुकलीवर बलात्कार झाल्याची घटना नुकतीच उघड झाली आहे. या ६ वर्षीय चिमुकलीला घराबाहेर बोलावून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. आरोपी नागेश कुरील असे बलात्कार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
आपल्या मुलीला रक्तत्राव होत असल्याची ही बाब लक्षात झाल्यानंतर मुलीच्या आईने पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ आरोपीस अटक केली असून पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. विशेष म्हणजे अमरावती जिल्ह्यातील ३ दिवसातील तीसरी घटना उघड झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
दोन दिवसापूर्वी जिल्ह्यातील दर्यापूर येथे ९ वर्षीय मुलीवर बलात्काराची घटना घडल्यानंतर धामणगाव येथे प्रेमप्रसंगातून मुलीची हत्या झाली आणि लगेचच ६ वर्षीय चिमुरडीवर बलात्काराची घटना घडल्याने जिल्ह्यात नेमकं चाललंय तरी काय असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.