महिलांसाठी कौशल्य विकास कार्यशाळा; पुणे विद्यापीठ व सातारा जिल्हा प्रशासनाचा पुढाकार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र। स्त्री शिक्षणाचा पाय रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सातारा जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ व १८ डिसेंबर रोजी महिलांसाठी उद्योजगता प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा पार पडली.

१७ डिसेंबर २०१९ रोजी प्र-कुलगुरू डॉ. एन एस उमराणी यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्प हार अर्पण करून कार्यशाळेला सुरुवात करण्यात आली. उदघाटन सत्रामध्ये डॉ. उमराणी यांनी महिलांना मार्गदर्शन केले. नायगावच्या विकासासाठी व कौशल्य विकासासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने नेहमीच सहकार्य केले जाईल, असे ते म्हणाले.

विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राचे अतिरिक्त संचालक डॉ (कॅप्टन) सी. एम. चितळे व डॉ. स्मिता सोवनी यांनी उद्योजगता प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास याविषयी मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी, कौशल्य विकास केंद्राच्या समन्वयक डॉ. पूजा मोरे व श्री. दिलीप ओक यांनी उद्योजगता प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास याविषयी मार्गदर्शन केले. या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये नायगाव व परिसरातील ७० महिलांनी सहभाग घेतला. डॉ. चितळे, डॉ पूजा मोरे, श्री. पंकज सवडतकर यांनी कौशल्य विकास केंद्राच्या विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले.

Leave a Comment