SKin Care | किचनमधील ‘या’ गोष्टींचा वापर करून मिळवा चमकदार त्वचा; असा करा वापर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

SKin Care | आजकाल प्रत्येक वयोगटातील माणसे ही स्वतःच्या त्वचेची (SKin Care) काळजी घेत असतात. त्वचा अत्यंत मुलायम चमकदार आणि सॉफ्ट दिसण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतात. अनेक लोक हे पार्लरमध्ये जातात आणि खूप खर्च करतात. त्याचप्रमाणे अनेक महागड्या ट्रीटमेंट आणि प्रोडक्ट्सवर देखील खर्च करतात. परंतु एवढे सगळे करूनही अनेकवेळा त्वचेवर त्याचा काहीच फायदा होऊ शकत नाही. उलट जास्त सौंदर्य उत्पादन वापरल्याने तुमच्या चेहऱ्याची चमक हळूहळू कमी होऊ लागते. आणि अनेक समस्या वाढतात.

त्याचप्रमाणे अनेक ब्युटी प्रॉडक्टमध्ये केमिकल असते. त्यामुळे तुमच्या त्वचेचा पोत देखील खराब होतो. आणि तुमचे पैसे देखील जास्त जातात. परंतु जर तुम्हाला पैसे खर्च न करता तुमची त्वचा अत्यंत सुंदर मुलायम करायची असेल, तर तुम्ही किचनमधील या तीन गोष्टींचा वापर करू शकता. त्यामुळे तुमची त्वचा (SKin Care) अत्यंत सुंदर आणि मुलायम होईल.

दही | SKin Care

दही हे मानवाच्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे आपल्या त्वचेला देखील दह्याचा खूप उपयोग होतो. ज्यांची त्वचा कोरडी आहे, त्यांच्यासाठी दही हे एक वरदान आहे. दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असते. त्यामुळे आपल्या त्वचेला आणि गुणधर्म मिळतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या चेहऱ्याला दहा मिनिट दही लावू शकता. आणि ते धुवू शकता. तुम्ही आठवड्यातून दोन वेळा जर चेहऱ्याला दही लावले, तर तुमचा चेहरा अत्यंत मुलायम होईल आणि डाग देखील दूर होतील.

मध

मध ही स्वयंपाक घरात वापरली जाणारी एक आरोग्यदायी गोष्ट आहे. अनेकवेळा लहान मुलांना खोकला, सर्दी झाल्यावर देखील मध देतात. मध आपल्या आरोग्यासाठी जितकी फायदेशीर आहे. तितकीच ती आपल्या त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. मधामध्ये अनेक नैसर्गिक गुणधर्म असतात. त्यामुळे तुम्ही मध – दहाचा फेस पॅक म्हणून देखील चेहऱ्याला लावू शकता.

लिंबू | SKin Care

लिंबू हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. लिंबामध्ये विटामिन सी मुबलक प्रमाणात असते. लिंबामुळे आपल्या चेहऱ्यावरील डाग, धब्बे आणि पिंपल्स देखील दूर होतात. तुम्ही मधामध्ये किंवा दह्यामध्ये लिंबाचा वापर करून जर चेहऱ्यावर लावलाय तर त्यामुळे तुमची स्किन खूप चांगली होईल.